महाराष्ट्र दिन कार्यक्रमात जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण.

दिनेश दमाहे, मुख्य संपादक

नागपूर,दि. 01 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण आज 1 मे, महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि रोख पारितोषिक दहा हजार रुपये गुणवंत क्रीडा मार्गदर्शक सॉफ्टबॉल विनोद सुरदुसे, दिलराज सिंगर खो-खो गुणवंत खेळाडू, श्रृती जोशी ,तलवारबाजी गुणवंत खेळाडू, शाश्रृती नाकाडे, पॅरा जलतरण गुणवंत खेळाडू यांना देण्यात आला. जिल्हा युवा पुरस्कार 2022- 23 चे सुद्धा वितरण महाराष्ट्र दिनी करण्यात आले. चेतन खुशालराव बेले व दीप्ती प्रशांत महल्ले यांना उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये सन्मान चिन्ह गौरव पत्र आणि रोख दहा हजार पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या या कामगिरीबद्दल उपसंचालक शेखर पाटील तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक आणि अनिल बोरवार, माया दुबळे व क्रीडा प्रेमीनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण.

Mon May 1 , 2023
दिनेश दमाहे, मुख्य संपादक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान नागपूर दि.01 : कस्तुरचंद पार्कवरील ध्वजावंदनानंतर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पोलीस, वन, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, समाजकल्याण, महिला व बालविकास आदी विभागातील तसेच प्रशासनातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सन 2021-22 मध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!