संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 2 :- छोट्या छोट्या कात्रनांना संग्रहित करण्यात गुंग असनारा मिलनसार स्वभावाचा धनी दिलिप वानखेडे पोटाची खडगी भरण्याकरीता पुण्यात नौकरी करीता जातो, कौटुबिक परीस्थीती आर्थीक दृष्ट्या कमकुवत असतांना सुद्धा संग्राहक वृत्ती चा छंद त्याला स्वास्थ्य बसु देत नव्हता त्याने परीश्रमाने तथागत बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रेतील एक इंच पासुन सात फुट पर्यन्त हजारो मुर्त्या संग्रहित केल्या ,डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या विविध भावमुद्रतील व विविध प्रसंगातील शेकडो फोटो संग्रहित केले. हजारो शिक्के विविध ऐतिहासिक डाक टिकट व शिल्प कलेला अनुरूप असंख्य शिल्प संग्रहित करून आपल्यातिल सुक्त कलाछंदाला एक नवा आयाम प्राप्त करून देण्यात अग्रेसर राहिलेत. नागार्जुन संग्रहालय पुने व कामठी येथे निर्माण करुन अभ्यासकासाठी उपयुक्त काम केले त्यामुळे ते व त्याच्या श्रमसाफल्यातुन साकारलेले संग्रहालय वल्ड बुक व लिमका बुक ऑफ रेकार्ड ने दखल घेतली .अश्या कामठीच्या भुमीत जल्मलेल्या दिलिप वानखेडे यांच्या कलागुणांचा वसा चिरंतन तेवत राहावा या करिता आपन सर्वानी ठामपणे निर्धार करणे हिच आवहानात्मक श्रदांजली ठरेल असे उदगार भदंत नाग दिपांकर महास्थविर यांनी व्यक्त केले.
बौद्ध ईतिहास संस्कृती संशोधन संस्था नागार्जुन संग्रहालय व बोधि वाचनालय च्या सयुक्त विध्यमाने त्याच्या द्वितीय पुण्यस्मरण दिना निमित्त कुंभारे कामगार कालोनी येथील परिसरातील पटांगणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी तिरपुडे रक्त पेटी च्या सहाय्याने रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आला ,बोधि वाचनालय पटांगणात थायलंड वरूण आनलेली बुद्ध मुर्ती दान करण्यात आली,नागार्जुन संग्रहालय च्या विस्तारीत बांधकाम चे भुमीपुजन मातोश्री अनुसयाबाई लक्ष्मन वानखेडे यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी भदंत नाग दिपंकर महास्थविर हे होते ,संचालन संस्थेच्या उपाध्यक्ष कल्पनाताई वानखेडे यांनी केले कार्यक्रमास प्रामुख्याने पुर्व नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, नगर सेवक प्रतिक पडोळे मुख्याध्यापक विजय नंदनवार,शुद्धोधन पाटिल, प्रमोद टेभुर्णे, अनिल बेदले ,गौतम माटे, अशोक वानखेडे, मोहन सातपुते अशोक थुल चंदु पाटिल आदि उपस्थित होते उपरोक्त कार्यक्रमात नवयुवक उच्च प्राथमिक शाळा चे विध्यार्थी, बोधि वाचनालय चे विध्यार्थी परीसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते आभार प्रदर्शन हर्षवर्धन वानखेडे केले.