अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल तर त्याचे वेड असणे खूप गरजेचे असते. एक ध्येयवेडा आणि जिद्दी व्यक्तीच अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवू शकतो. असाच नागपूर चा सायकलपटू दिलीप भरत मलिकने समाजातील विविध ज्वलंत विषयांकडे देशवासींचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी भारतभ्रमण सायकल यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने तो सामाजिक संदेश तर देत आहेच, शिवाय प्रतिष्ठेच्या लिम्का व गिनेस बुकमध्ये ही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करत आहे.
महानगरपालिकेतील धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या दिलीपने गेल्या २६ जानेवारी रोजी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून ४५ हजार ७११ किमी अंतराच्या या महत्त्वाकांक्षी सायकल यात्रेला सुरवात केली होती. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेशमार्गे २१ हजार २५० किमीचा पहिला टप्पा ७ महिने ५ दिवसांत पूर्ण करून उपराजधानीत नागपूर येथून पुन्हा दुस-या टप्प्यासाठी निघाला असुन तो आज गोंदियात येथे पोहचला असुन गोंदिया येथे त्यांचा स्वागत सायकलिंग संडे द्वारा ‘डोल ताश्यात करण्यात आले तसेच अनेक सामाजिक संघटनेने दिलीप मलिक चा स्वागत केला.
आपल्या पुडाच्या प्रवासासाठी दक्षिण भारताकडे पुन्हा रवाना झालेला आहे.