संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4:- देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार दिनांक 05/07/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता आगमन होणार आहे.
नागपूर विमानतळ येथे असलेल्या परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात बहूजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत व सत्कार करण्यात येईल.
या प्रसंगी बहूजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अँड. सुलेखा कुंभारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. तसेच बहूजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे देवेंद्र फडणवीस यांचे शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात येईल.
बहूजन रिपब्लिकन एकता मंचच्या पदाधिका-यांनी या स्वागत प्रसंगी उपस्थित राहण्याचे आव्हान बहूजन रिपब्लिकन एकता मंचचे महासचिव अजय कदम यांनी केले आहे.