महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
• १६०० क्युबिक मीटर मलबा आता पर्यंत काढण्यात आला
नागपूर :- महा मेट्रोने 19 जुलै 2023 (बुधवार) पासून टेकडी उड्डाणपुलाचे हाती घेतले असून आता पर्यंत ४०% पूल तोडण्याचे कार्य पूर्ण झाले आहे ज्यामधून सुमारे १६०० क्युबिक मीटर आता पर्यंत मलबा काढण्यात आला आहे. पुलाच्या पिलरला तोडण्याकरिता ४ ब्रेकरचा उपयोग केल्या जात आहे. ब्रेकरच्या नोंक ने पिलरला कमजोर करून कापण्याचे कार्य केल्या जात आहे. कार्यस्थळी ब्रेकर, क्रशर, एक्सलेटर, जेसीबी आदि चा उपयोग केल्या जात आहे.
टेकडी उड्डाणपूल तोडताना खालील मशीनचा करण्यात येत आहे उपयोग :
१. १४ एम ४० टी एक्सकेव्हेटर ५ टन
२. वोल्व्हो क्रोलेर एक्सकेव्हेटर
३. स्पेयर जॉ क्रशर
४. डस्ट सस्पेंशन सिस्टम
५. जेसीबी लोडर
६. मिनी एक्सकेव्हेटर
७. ४५ एमएम हॅमर ड्रिल मशीन
८. बॉश ११ किग्रॅम इलेकट्रोपेन्यूमॅटिक हॅमर्स
९. बॉश १६ किग्रॅम इलेकट्रोपेन्यूमॅटिक हॅमर्स
१०. सायलेंट डीजी सेट ४० केव्हीए
११. ट्रान्सपोर्ट ट्रक