कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

नागपूर  :  नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१७ फेब्रुवारी) रोजी ०८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ५५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत शंकरनगर येथील श्री साई सभागृह यांच्या विरूध्द अवैधरित्या डिस्प्ले बॅनर आणि बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. तसेच कॅनल रोड, रविनगर येथील वीला ५५ यांच्या विरूध्द रस्त्यालगत कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ येथील नित्या शर्मा विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला.

          गांधीबाग झोन मधील महेश्वरी पंचायत, जैन भवन आणि कोलबा स्वामी संस्कृतीक भवन यांच्या विरूध्द कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु २०,००० च्या दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन येथील नाईक तलाव तांडापेठ येथील तेजराम नंदनवार यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करून रु ५,००० च्या दंड वसूल केला.   मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त, अधिकरी ३ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर

Fri Feb 18 , 2022
– सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेचे करणार निरीक्षण नागपूर :-  मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त (सीआरएमएस) श्री जनक कुमार गर्ग आणि इतर अधिकारी उद्यापासून (फेब्रुवारी १८) ३ दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आपल्या या दौऱ्यात अधिकाऱ्यांचे हे पथक रिच ४ ( सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर) मेट्रो स्टेशनची प्रामुख्याने पाहणी करतील. सीआरएमएस चे पथक १८ फेब्रुवारीला नागपुरात दाखल होईल आणि महामेट्रो नागपूर अधिकाऱ्यांशी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com