कोविड लसीकरणासाठी मनपाने केली वाहनधारकांची तपासणी

चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १४ डिसेंबर रोजी गांधी चौक, गोल बाजार, महाकाली मंदिर परिसर येथे कारवाई करण्यात आली.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनेवरून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आज १४ डिसेंबर रोजी  गांधी चौक, गोल बाजार, महाकाली मंदिर परिसर येथे वाहनधारकांना थांबवून लसीकरण आणि मास्कबाबत विचारपूस केली. यादरम्यान ज्या नागरिकांनी अद्याप लस घेतली नव्हती, अशांना सूचित करण्यात आले.

आज दिनांक 14 रोजी सकाळी 10  वाजेपासून महाकाली कार्यालय मुख्य रस्त्यावर मोहीम राबवून नागरिकांना लसीकरण करण्याबाबत व मास्क लावण्याबाबत सूचना देण्यात आली. यावेळी प्रभारी सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, स्वच्छता शिपाई व कर्मचारी सहभागी झालेले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराट्र व्यापारी व उधोग सेल के मुखिया बने अतुल कोटेचा नाना पटोले ने कीं नियुक्ति

Wed Dec 15 , 2021
नागपुर – अतुल कोटेचा को महाराष्ट्र के उद्योग-व्यापार सेल का अध्यक्ष बनाए जाने पर सर्वत्र ख़ुशी जताई जा रही है।व्यापार-जगत से लंबे अरसे से जुड़े व्यक्ति को इस पद पर महाराट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्य्श श्री नाना पटोले ने अतुल कोटेचा क़ो उत्तर महाराट्र, मराठवाडा, व विदर्भ का प्रभार दिया गया. कांग्रेस पार्टी के इस निर्णय की सभी कांग्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com