मनपातर्फे विसर्जनासाठी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी..

चंद्रपूर  – ३१ ऑगस्ट बुधवार रोजी श्रीगणेशाचे आगमन होणार असुन गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असुन मनपातर्फे विसर्जनासाठी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आले आहे.

शहरात दीड दिवसाचा, पाच दिवसाचा तसेच दहा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन केले जाते. घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. मागील वर्षी २० निर्माल्य कलश व २० कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यावर्षी २३ कृत्रिम तलाव व २० निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली आहे. कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये झोन क्र. १ (कार्यालय) – २, साईबाबा मंदीर – १, दाताळा रोड,इरई नदी – २, तुकुम प्रा.शाळा (मनपा,चंद्रपूर) – २, नटराज टॉकीज (ताडोबा रोड) – २, गांधी चौक – 1,शिवाजी चौक – २, रामाळा तलाव – 4,लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १, विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १, महाकाली प्रा. शाळा – 1, सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – 2 , झोन क्र. ३ (कार्यालय) – २ असे एकुण २३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे.

श्रीगणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक ठिकाणी मंडप परवानगी मिळणेकरिता कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता एकल खिडकी प्रणाली सुरू करण्यात आली असून महानगरपालिका, पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व विभागांच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या एकाच अर्जाव्दारे मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील 138 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाईन मंडप परवानगी साठी अर्ज केले आहे. शासन निर्देशानुसार श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क महानगरपालिकेने आकारलेले नाही.

यंदा निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती ह्या कमी उंचीच्या असण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन यांच्यामार्फत आधीच करण्यात आले होते, तसेच मूर्ती पीओपीच्या नसाव्या यासाठी मनपाने योजनाबद्ध मोहीम आखली होती.श्रीगणेशोत्सव 2022 च्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर महानगरपालिका दक्ष असून भाविकांनीही श्रीगणेशोत्सव इकोफ्रेंडली निर्विघ्नपणे संपन्न व्हावा याकरिता सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त  राजेश मोहीते यांनी केले आहे.

कृत्रिम तलाव स्थळ

१) झोन क्र. १ (कार्यालय) – २

२) साईबाबा मंदीर – १

३) दाताळा रोड,इरई नदी – २

४) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २

५) नटराज टॉकीज (ताडोबा रोड) – २

६) गांधी चौक – 1

७) शिवाजी चौक – २

८)रामाळा तलाव – ४

९) महाकाली प्रा.शाळा – 1

१०) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १

११) झोन क्र. ३ (कार्यालय) – 1

१२) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – 2

१३) शिवाजी चौक – २

एकूण – २३

निर्माल्य कलश

1) झोन क्र. १ (अ) – ५

2) झोन क्र. १ (ब) – १

3) झोन क्र. २ (अ) – ८

४) झोन क्र. ३ (ब) – १

५) झोन क्र. ३ (अ) – ३

६) झोन क्र. ३ (क) – २

एकूण – २०

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर कि मेट्रो भवन को सदिच्छा भेट

Wed Aug 31 , 2022
नागपूर : नागपूर के नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर ने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन के मेट्रो भवन को सद्भावना भेट दी. इस भेट के दरम्यान उन्होने महा मेट्रो के प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित के साथ नागपूर मेट्रो से जुडे जमीन, महसूल तथा इतर संबंधित विषयों पर विस्तार से चर्चा की मेट्रो भवन और नागपूर मेट्रो संबंधित जानकारी लेते हुए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!