संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी.
कन्हान : – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावती येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केल्याने कन्हान येथे काँग्रेस पार्टीच्या पदाधिका-यानी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार निर्दशने करित निषेध करून पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.संभाजी भिडे यांनी अमरावती मध्ये बडनेरा मार्गा वरील जय भारत मंगलम सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य करून महापुरूषाचा अपमान केला. संभाजी भिडे यांची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. संभाजी भिडे यांचा व्यक्तव्याच्या निषेधार्थ कन्हान शहर काँग्रेस पार्टी पदाधिका-यांनी शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ. रीता नरेश बर्वे च्या नेतृत्वात जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. कुंदा राऊत यांचा प्रमुख उपस्थितीत गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करून संभाजी भिडे यांचा विरोधात जोरदार निर्दशने करित त्यांचा निषेध केला. त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक यशवंत कदम यांना निवेदन देऊन संभाजी भिडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष मा. योगेंद्रबाबु रंगारी, नगरसेवक मनिष भिवगडे, राजेश यादव, नगरसेविका रेखा टोहणे , गुंफा तिडके, कल्पना नितनवरे, पुष्पा कावडकर, मिना ठाकुर, शैला तायवाडे, सुनिता मानकर, सविता बावने, प्रतिभा वायकर, मंदा बागडे, सुनंदा कठाने, माया वाघमारे, वंदना बागडे, भुमिका बोरकर, रवि रंग, आकिब सिद्धिकी, रोहित बर्वे, प्रदीप बावने, अजय कापसिकर, निखिल रामटेके, शक्ती पात्रे, महेश धोंगडे ,शेखर बोरकर, शरद वाटकर, सतिश भसारकर, आनंद चकोले, विनोद येलमुले, अश्फाक खान सह कॉग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.