संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 21 :- कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत संगणक परीचालका कडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे एकाच छताखाली 29 प्रकारचे दाखले ,परवाने तसेच जमा-खर्चाची नोंद, ग्रामसभा,मासिक सभेचे ऑनलाईन कामकाज, जनगणना, घरकुल , सर्व्हे,प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी कामे करून घेतली जातात .शासन – प्रशासन व जनतेमधील दुवा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र मागील चार महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने या संगणक परीचालकावर मानधना अभावी उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे कसे?असा प्रश्न पडला आहे.
प्रत्यक्षात या संगणक परीचालकाना 6 हजार 900 रुपये मानधन दिले जाते त्यातही चार चार महिने मानधन मिळत नसल्याने संगणक परीचालकांची एक प्रकारे गोच्ची होत आहे.ग्रामपंचायती 15 व्या वित्त आयोगातील 10 टक्के रक्कम असे दरमहा 12 हजार 700 रुपये प्रमाणे दरवर्षी एक लक्ष 52 हजार 400 रुपये अनामत निधी रक्कम ‘राष्ट्रीय ग्राम स्वराज्य ‘अभियानामार्फत सीएससी , एसपीव्ही कंपनीकडे दिले जाते मात्र संगणक परीचालकाना फक्त सात हजार रुपये मानधन दिले जाते त्यातही चार चार महिने मानधन मिळत नसल्याची शोकांतिका आहे.