पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची केली पाहणी.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

-धमनचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणा तसेच संबंधीत विभाग सज्ज

कामठी ता प्र 9:- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या कोण्या कोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने नागपूर येथील दीक्षाभूमी वरून कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लाखोंच्या संख्येने अनुयायी भेट देत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या उद्देशाने विविध विभागासह पोलिस यंत्रणा यांची ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पाहणी व आढावा बैठक घेण्यात आली.

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला लाखोंच्या संख्येने भेट देणाऱ्या धम्मबांधवाकरिता शासनाच्या वतीने सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच कायदा ,सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने विविध विभागासह पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने आज बुधवार ला नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, सह पोलिस आयुक्त तांबोळी,अतिरिक्त पोलीस आयुक्त शेवाळे, उपायुक्त अर्चित चांडक,उपायुक्त निकेतन कदम,उपायुक्त श्वेता खेडकर, वाहतूक पोलीस निरीक्षक पतंगे,पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे,पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे,मुख्याधिकारी संदीप बोरकर,गटविकास अधिकारी यांनी आढावा घेतला.

याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख,ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे उपस्थित होत्या.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लाखोंच्या संख्येने देश विदेशातील बोद्ध बांधव हे दिक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात येणाऱ्या भाविकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय,रस्त्याचे डागडुजीकरण, पार्किंग व्यवस्था,अखंडित वीज पुरवठा,जनरेटर तसेच संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे या सर्व उपाययोजना पूर्ण करणे असे निर्देश पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची पाहणी केली या दरम्यान ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र ,ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर ,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राला सुदधा भेट दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नगर विकास मंत्रालयाने येरखेडा नगरपंचायतीची काढली अधिसूचना.

Thu Oct 10 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी गावकऱ्यांनी नगर विकास मंत्रालयाच्या अधिसूचनेचा जल्लोष करून स्वागत केले.  कामठी ता प्र 9:- महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालयाने 4 ऑक्टोंबर 2024 ला येरखेडा नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर केल्याने येरखेडा येथील गावकऱ्यांच्या वतीने नगर विकास मंत्रालयाचे जल्लोष करून स्वागत केले नगर नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गावकऱ्यांच्या चार महिन्यापासून प्रयत्न सुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com