चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात झिरो डम्प, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्स्परन्सी (डिजिटल इनाब्लेमेन्ट ) आदी विषय यात आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली होती. यात वापरलेल्या वस्तूंपासून पुननिर्मिती कराण्याविषयि विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले होते. यात विविध कॉलेजला आमंत्रित करून त्यांच्याकडे असलेल्या इनोव्हेटिव्ह आयडियावर चर्चा करण्यात आली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी sanitation.ccmc2010@gmail.com वर मेल करावा.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा १२ जानेवारी रोजी चांदा क्लब ग्राउंड येथे आयोजित “महापौर सखी महोत्सवा”त मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.