संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सेवन औषधांचे, करील उच्चाटन हत्तीरोगाचे
कामठी ता प्र 23:-हत्तीरोगा चे मुळातून उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कामठी तालुक्यातील 100 टक्के जनतेला हत्तीरोग प्रतिबंधक औषधींचा लाभ मिळावा यासाठी कामठी तालुका आरोग्य विभागाच्या वतीने 25 मे ते 5 जून या कालावधित कामठी तालुक्यात हत्तीरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे .या मोहिमेसंदर्भात नागरिकांचा अधिकाधीक प्रतिसाद प्राप्त होत हत्तीरोग नियंत्रणात येण्यासाठी जनजागृतीपर कामठी तालुका आरोग्य विभाग कार्यालयात हत्तोरोग निर्मूलन कार्यक्रम घेण्यात आला .याप्रसंगी नागरिकांनी घरी आलेल्या आशा वर्कर, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या हस्ते गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग निर्मूलन च्या गोळ्या घेण्याचा संदेश दिला. दरम्यान सेवन औषधांचे करील उच्चाटन हत्तीरोगाचे असे आव्हान कामठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे.
सदर मोहीमे दरम्यान आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत पात्र लाभार्थ्याना ही औषध आरोग्य कर्मचारी यांच्या समक्ष त्याच वेळी प्रत्यक्षात खावयाची आहे.ही मोहीम कामठी तालुक्यात कामठी शहर येथे उपजिल्हा रुग्णालय , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कामठी ग्रामीण मध्ये गुमुथळा, गुमथी व भुगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे.सदर मोहीम अंतर्गत कामठी शहर येथे 1 लक्ष 222 पात्र व्यक्तींना 176 आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर,अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांच्या मार्फत प्रत्यक्षात गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे.सदर मोहीम राबविण्यासाठी 14 पर्यवेक्षक कार्य करतील तसेच ग्रामीण कामठी येथे 1 लक्ष 24 हजार 624 लाभार्थ्याना 178 आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांच्या मार्फत प्रत्यक्षात गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे तसेंच ग्रामिंण कामठी येथे 18 पर्यवेक्षक कार्य करतील.तर या मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरातील मुख्य लोकप्रतिनिधीसह, ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधो, सरपंच, ग्रामसेवक,लोकपुढारी आदीसह विविध धर्मातील धर्मगुरूंची मदत घेत नागरिकांना सदर मोहिमेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
तेव्हा या मोहिमेत स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी आदी घरोघरी जाऊन औषधीचे वितरण करनार आहेत .तेव्हा सेवन औषधांचे करील उच्चाटन हत्तीरोगाचे या संकल्पनेतून घरोघरी होत असलेल्या हत्तीरोग निर्मूलन औषधीचे स्वयंस्फूर्तिने सेवन करावे असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारो डॉ संजय माने यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातुन व्यक्त केले.याप्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी,शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत डांगोरे, निलेश शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांनो 25 मे ते 5 जून पर्यंतच्या कालावधीत हत्तीरोग दुरीकरण मोहिम कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या-डॉ संजय माने
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com