संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9:- आगामी होऊ घातलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पाश्वरभूमीवर आज 9 जुलै ला कामठी पंचायत समिती तर्फे पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती.यावेळी खसाळा केन्द्रा अंतर्गत उ.प्रा.शाळा,खसाळा येथे केंद्रातिल सात शाळेतिल एकूण 74 विद्यार्थी इयत्ता पाचवी साठी तर इयत्ता आठवी साठी 8 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून हजर होते.याप्रसंगी पहिल्या पेपर सोडवुन झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजन वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर .यांनी आकस्मिक भेट दिली व परीक्षा केंद्रा वरील भौतिक सुविधा ची पाहणी करुन समाधान व्यक्त केले, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा व प्रश्नपत्रिका बद्दल काय वाटते,प्रश्नपत्रिका सोपी की कठिन,मागील व आजच्या परिक्षेतील प्रश्नंबाबत काठिन्यपातळी व पुढील भविष्यावर वार्तालाप केला .
यावेळी विद्यार्थ्यानी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रश्नानां मनसोक्त उत्तरे देत ,”परीक्षा पे चर्चा”केली.या प्रसंगी गटविकास अधिकारी अंशुजा गराटे , गट शिक्षण अधिकारी प्रदीप नागपूरे,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर,केन्द्र प्रमुख सुनील बालपांडे,चंद्रशेखर शिंदे,नितिन रायबोले,तृप्ती वंजारी,रंजना हिवाळे उपस्थित होते.