संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश्य स्पष्ट करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजळणी दिली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ता डॉ. बी. आर. मस्के, प्रोफेसर व इतिहास विभाग प्रमुख, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर यांनी छत्रपतींच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वातून प्रेरणास्त्रोत घेवून मार्गक्रमण करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी छत्रपतींच्या संरक्षण व्यवस्थेत किल्यांचे महत्व विषद करतांना विद्यार्थ्यांना नव-नवीन उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केले. यावेळी शालिनी सरोज, प्रिया कोडवते, ख़ुशी शर्मा, संध्या मस्के, तनुश्री नितनवरे, विकास शेंडे, तपन गणवीर, श्रुष्टी वाडीभस्मे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मनीष चक्रवती, उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी, डॉ. देविदास गाडेकर, डॉ. जयंत रामटेके, डॉ. अजहर अबरार, डॉ. समृद्धी टापरे, डॉ. आशिष थूल व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अलकमा हैदरी तर आभार आलिया अली ने मानले.