नागपूर, ता. १९ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
शनिवारी (ता.१९) महाल येथील गांधीद्वारा पुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, माजी महापौर अर्चना डेहनकर, नगरसेवक प्रमोद चिखले, माजी नगरसेवक प्रा. प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.
मनपा मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला उपमहापौर मनीषा धावडे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.