सिडीएस परिक्षेत देशात प्रथम आलेल्या अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेंस सर्विसेस (सिडीएस) परीक्षेत देशातून पहिला आलेला अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात पुष्पगुच्छ देऊन श्री.पवार यांनी अभिनंदन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उपस्थित होते.

            मुळच्या बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अपूर्व पडघान याने नागपूर येथील एन आय टी अभियंत्रिकी महाविद्यालयातून  मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पदवी घेतली आहे. त्याचे वडील पोलीस विभागात कार्यरत आहेत. एअर फोर्समध्ये पुढे काम करण्याचे अपूर्व पडघान याने ठरविले आहे.  अपूर्वच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातून या क्षेत्रात येऊ इच्छ‍िणाऱ्या युवकांसाठी प्रेरणा मिळणार आहे, असे उद्गार मान्यवरांनी काढले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबला भेट

Fri Jan 14 , 2022
मुंबई : वांद्रे येथील स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी भेट दिली.  या भेटीदरम्यान या लॅबचे दैनंदिन काम कसे चालते याबाबतची पाहणी त्यांनी केली.             स्टेम्झ ऑन्को डायग्नोस्टिक लॅबमध्ये कतार येथे कामासाठी, व्यवसायासाठी जाणाऱ्या नागरिकांची आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी केली जाते. या पाहणीदरम्यान या लॅबचे संचालक अमन बक्षी यांनी  वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना या लॅबचे काम, या लॅबची उपयुक्तता, येथे दैनंदिन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!