नवी दिल्ली : हळद, बेदाणा, मसाले, चामडयाची उत्पादने, बाबुं फर्निचर, पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल आदि महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे.              महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगतीमैदान येथील हॉल क्र. २ मध्ये              राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची  विविध उत्पादने  व  हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या […]

रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58971 एकूण पॉझिटिव्ह60106 क्रियाशील रुग्ण02 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट221 एकूण टेस्ट474281 भंडारा, दि. 25 : जिल्ह्यात गुरुवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून आज (दि.25) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 221 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58971 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 74 हजार 281 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) रोजी ०८ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ९५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

उपजिल्हा रुग्णालयात शिबिराच्या पहिल्याच दिवशी  ५३० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ…बहुतांश रुग्णांच्या  शस्त्रक्रिया यशस्वी…   रामटेक :- राष्ट्रीय आरोग्य अज्ञान अभियानांतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने  रामटेक उपजिल्हा रुग्णालयात निःशुल्क वैद्यकीय, दंतरोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात ऐकून ५३० रुग्णांनी  शिबिराचा लाभ घेतला.. बऱ्याच रुग्णांच्या शस्त्रक्रिया […]

अभियंत्यांनी बांधकामात नवीन तंत्राचा वापर स्वीकारावा : ना. नितीन गडकरी – सिव्हिल अभियंत्यांची 36 वी राष्ट्रीय परिषद नागपूर- रस्ते असो की इमारत बांधकामात अभियंत्यांनी नवीन तंत्राचा वापर स्वीकारून बांधकामाचा खर्चात बचत करावी. हे करताना प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तसेच बांधकाम क्षेत्रासाठी लागणार्‍या वाहनांमध्ये जैविक इंधनाचा वापर करावा. यामुळे पर्यावरण दूषित होणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, महामार्ग […]

मुंबई – लोकायुक्त चौकशीची भाजपची मागणी ! मास्कपासून व्हेंटिलेटरपर्यंत प्रत्येक मदतीसाठी केंद्र सरकारसमोर हात पसरून केंद्राच्या नावाने खडे फोडणाऱ्या ठाकरे सरकारच्या कोविड सहाय्यता निधीत सहाशे कोटींचा बेहिशेबी निधी पडून असतानाही राज्यातील कोरोना योद्ध्यांचे आणि कोरोना मृतांचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी उपलब्ध नसल्याची खोटी कारणे देत ठाकरे सरकारने जनतेस वाऱ्यावर सोडले असून, सहाशे कोटींचा साह्य निधी दाबून न ठेवता तातडीने […]

मुंबई – राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरुपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा.  पंकजा मुंडे यांनी  मंगळवारी केली. […]

बीड- साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या  घटना घडल्या तरी राज्यातील निर्भयांचा आक्रोश  सरकारच्या कानी पडलेला नाही. महिला सुरक्षेच्या विषयात आघाडी सरकारची बेफिकीरी आणि निष्क्रीयता चीड आणणारी आहे. आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी  स्वत:च कायदा हाती घ्यायचा  की घरकोंबड्या सरकार प्रमाणे त्यांनीही घरातच बसून रहायचे ? असा संतप्त सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी बुधवारी  पत्रकार […]

रामटेक :-घरातील काही काम रिपेअर करताना घरातील बीम कोसडून डोक्याला लागल्याने  एका विवाहित तरुणाचा मृत्यू   आज दि २४ नोव्हे ला सकाळी दरम्यान शीतलवाडी परिसरात  घडली.सविस्तर माहिती अशी की मृतक प्रजवलीत प्रवीण अंधारमुले वय ४१ वर्ष रा शास्त्री वॉर्ड ,रामटेक येथील रहिवासी असून त्याने शीतलवाडी येथे एक घर विकत घेतले होते.त्या घराच काही काम रिपेअर कराचं म्हणून त्या  ठिकाणी  आज सकाळी […]

चंद्रपूर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२२ अंतर्गत दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे आयोजित मतदान केंद्र क्र. ५४ ते ८० यांची विशेष वार्डसभा बुधवार, दि. २४/११/२०२१ रोजी कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकारनगर येथे दुपारी १२ वाजता पार पडली.   वॉर्डसभेला उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सभेत […]

नागपुर– वर्तमान में फोटोग्राफी और फोटोशॉप युवा पीढ़ी के लिए एक ट्रेंड बन गया है। इसलिए फोटोशॉप और फोटोग्राफी सीखने में हर किसी रूचि है। साथ ही, इस क्षेत्र में नौकरी के अवसर भी उपलब्ध हैं। इसलिए युनाइटेड फोरम ऑफ फोटोग्राफर्स वेलफेयर एसोसिएशन (एफएमएसए) द्वारा युवाओं को उन्नत कौशल के गुर सिखाने के लिए फोटोशॉप वर्कशॉप का आयोजन किया था। इस […]

नागपूर – सुगत वाचनालय संस्थेचे नारे-निदर्शने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतातील एक पूज्यनिय व्यक्तिमत्त्व आहेत. संपूर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदराच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते. सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक आहे. असे असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सी.ए. रोड येथे महामेट्रो द्वारा स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा एकेरी उल्लेखाचा मोठा फलक लावण्यात आला. त्यामुळे […]

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने दाताळा रोड रामनगर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील हमाल, फळ विक्रेते, भाजीपुरवठादार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र -२ च्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात २७५ हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. शिवाय ८२ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली. लसीकरण शिबीराचे उद्घाटन झोन-१ च्या सभापती छ्बुताई वैरागडे, कृषि उत्पन्न बाजार […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २४ नोव्हेंबर) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४२ मंगल कार्यालयाची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात […]

अमरावती : देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेतीविकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.             येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी […]

झोन सभापती, नगरसेवक, झोनचे सहायक आयुक्त व नागरिकांची उपस्थिती नागपूर  : नागपूर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता.२४) मनपाच्या दहाही झोनमध्ये बैठक घेण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये संबंधित झोनचे झोन सभापती, झोनमधील नगरसेवक, सहायक आयुक्त आणि प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.             महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिका-यांनी १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचे […]

भंडारा  – जिल्हा परिषद व भंडारा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी तयार असल्याची सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील 13 नुसार प्रारूप मतदार यादी यासंबंधीच्या प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून भंडारा जिल्हा परिषद व भंडारा पंचायत समितीची अंतिम मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ व निरीक्षणासाठी तहसील […]

भंडारा : लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर कार्यरत आहे. नुकतेच भंडारा जिल्ह्याने राज्यात लसीकरणात आघाडी घेतली मात्र शंभर टक्के लसीकरणासाठी प्रशासन कडक पाऊले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अद्याप एकही डोस न घेतलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी औद्योगिक आस्थापनांना दिले. नुकतीच उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, […]

मुंबई  : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली. दुबई सांस्कृतिक कार्य […]

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट अमरावती  :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली. समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com