स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्प कृषी विभागांतर्गत विविध यांत्रिकीकरणाचे साहित्य, निधीचे वाटप कोविड काळात चांगले कार्य केलेल्या गावस्तरावरील कर्मचाऱ्यांचाही सन्मान गडचिरोली, (जिमाका)  : जिल्हा प्रशासनाकडून स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे फीत कापून […]

मुंबई – मुंबईजवळील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एक व्यक्ती जो मुंबईला जाण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे दिल्ली विमानतळावर आला होता, त्याची कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकारासाठी सकारात्मक चाचणी झाली आहे, अधिका-यांनी शनिवारी सांगितले की, महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. . कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एका व्यक्तीची COVID-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तो राज्यातील पहिला अधिकृत केस आहे,” असे […]

नागपुर – नागपुर जिल्हा सिकई मार्शल आर्ट संघटनेच्या खेळाडूनी 28 व 29 नवंबर रोजी आयोजित केलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पधेत यश संपादित केले असून राष्ट्रीय लेवल साठी निवड करण्यात आली आहे   11 वर्षा खालील संचित अग्रवाल सुवर्ण पदक , आंनद अमलानी सुवर्ण पदक , दक्ष अग्रवाल सुवर्ण पदक , धैर्या जैन रोम्य व कास्य पदक व शाश्वत […]

-विनापरवानगी झाडांच्या फांद्या छाटल्या : मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापणाऱ्या रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पीटलविरोधात शनिवारी (ता.४) मनपातर्फे सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आली. क्रिम्स हॉस्पीटल परिसरातील वृक्षांच्या फांद्या कापण्यात आल्याचे प्रकरण लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आणि […]

-महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली पाहणी : ‘ओमायक्रॉन’च्या संभाव्य धोक्यात ठरणार उपयुक्त नागपूर: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌‌द्यापीठाच्या श्री जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये […]

रामटेक  -समग्र शिक्षा – समावेशीत शिक्षण  पंचायत समिती रामटेक व स्नेहसदन मतिमंद मुलांची विशेष अनिवासी शाळा, शितलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने   दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दीन सप्ताह निमित्य स्नेहसदन विशेष मुलांची अनिवासी शाळा शितलवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह साजरा करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून मा.डॉ. उन्मेश् आंभोरे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय सावनेर व प्रमुख पाहुणे आशिषजी जैस्वाल, आमदार […]

कृषी तज्ज्ञ, मंडळ कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक यांनी बोरी , काचुर्वाही , मसला येथे  दिली भेट शेतकऱ्यांन सोबत केली चर्चा रामटेक – मिरची हे पिक रामटेक तालुक्यातिल एक महत्वाचे नगदी  पिक असून मागील 10 ते 15 दिवसाचा प्रतिकूल हवामान परिस्तिथीमुळे मिरची पिकावर फुलकिड्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असून त्यामुळे मिरची पिकावरील चुरडा-मुरडा या विषाणूजन्य रोगाची लागण झालेली आहे,  त्यामुळे […]

रामटेक :- नुकतीच पं. स . रामटेक येथे  मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर  योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक श्री इलामे सर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  जखलेकर  तसेच पंचायत समिती चे गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे  उपस्थित होते. यावेळी खालील विषयाबाबत आढावा घेण्यात आला. 1. ODF PLUS जाहीर करावयाची […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात मनपाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी पुढाकार घेऊन विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांग खेळाडूसाठी तसेच दिव्यांगांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच पात्र दिव्यांगांना मोटराइज्ड ट्रायसिकल सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.             समाजातील प्रत्येक घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ देतानाच महानगरपालिकेच्या माध्यमातूनही त्यांना लाभ मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून […]

  महापौरांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा : ४५० बेड्स, ११०० ऑक्सिजन सिलींडर, पुरेसा औषधसाठा नागपूर : जगातील अनेक देशांमध्ये संक्रमणाचा धोका वाढलेल्या कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटच्या संभाव्य धोक्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. नव्या व्हेरियंटच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी मनपाच्या आरोग्य यंत्रणेद्वारे सुरू असलेली कार्यवाही आणि मनपाकडे असलेली आरोग्य सुविधा यासंदर्भात शुक्रवारी (ता.३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला.             महापौर सभागृहामध्ये महापौरांच्या […]

नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व एकत्रित न येता, आयोजित करण्याच्या सूचना तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका […]

 जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात नागपूर :  दिव्यांग हा सामाजातील दूर्लक्षित घटक असल्यामुळे नागरिकांनी त्याच्या सर्वागिण विकासाकरीता मदतीचा हात देणे, अत्यंत गरजेचे आहे.  दिव्यांगांना व्यंग असले तरी त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभाशाली व्यक्तीत्वामुळे ते  अनेक बाबतीत इतरांच्या पुढे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी  चर्चा सत्र व कार्यशाळेच्या माध्यमातून प्रचलित व्यवस्थेत सामावून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन दिव्यांगांना आवश्यक त्या सर्व सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे […]

चंद्रपूर : सार्वजनिक रस्त्यावर घनकचरा फेकल्या प्रकरणी व घनकचरा व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई महेश भवन येथे मारुती कॅटर्स यांच्या विरोधात करण्यात आली. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, अशी तंबीही महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाने दिली आहे. शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून चंद्रपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी […]

भंडारा- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने रत्नप्रभा ठाकरे व प्रकाश बागडे या दोन दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र (UDID Card) चे वाटप  जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे उपस्थित होते. स्वावलंबन कार्ड (UDID Card) चे फायदे  प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला नोंदणीकृत असा युनिक क्रमांक देईल. सदर स्वावलंबन कार्ड दिव्यांगत्वाचे लाभ मिळण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ग्राह्य धरण्यात येते. केंद्रित पोर्टलद्वारे संपूर्ण देशभरात दिव्यांग व्यक्तींच्या डेटाची ऑनलाईन उपलब्धता असेल. केंद्रीयकृत वेब पोर्टलद्वारे उपलब्ध असलेला दिव्यांग व्यक्तींचा डेटा सरकारच्या विविध नियोजन प्रक्रियेस मदत करेल. शासकीय रुग्णालये/ वैद्यकिय मंडळाद्वारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीची गणना करण्यासाठी त्वरीत मुल्यांकन प्रक्रिया उपलब्ध आहे. दिव्यांग व्यक्तींच्या डेटाची नक्कल करण्यात येत नाही. दिव्यांग व्यक्तीद्वारे किंवा त्यांचे वतीने दिव्यांग प्रमाणपत्राचे ऑनलाईन नुतनीकरण आणि माहिती अद्ययावत. दिव्यांग व्यक्तींच्या डेटाची विविध प्रकारे आवश्यकतेनुसार एम. आय.एस. रिपोटींग फ्रेमवर्क करणे सोपे होते. दिव्यांग व्यक्तिकरिता सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांच्या कार्यक्षमतेसह प्रभावी व्यवस्थापन करणे सोपे होते. भविष्यात अतिरिक्त शोधल्या गेलेल्या दिव्यांगाची काळजी घेणे सोपे होईल. अति तीव्र प्रकारच्या दिव्यांग व्यक्तिकरिता सहज दिव्यांग प्रमाणपत्र मिळेल. अध्ययन अक्षम, ओटिझम यासारख्या दिव्यांग बालकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळेल. युडीआयडी सिस्टम विविध श्रेण्यांनुसार डेटाची देखभाल करते. प्राप्त झालेला डेटा शासनाच्या विविध नियोजन प्रक्रियेस मदत करेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले उत्तर महागड्या टोलमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे, पण खासदार, आमदार टोल का भरत नाहीत? असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात असतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज तकच्या एका कार्यक्रमाता या प्रश्नाला उत्तर दिले. दरम्यान, केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तब्बल एक वर्षाहून अधिक काळ […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (३ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४२०६७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९३,९२,५००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला नाही. […]

महाविकास आघाडी सरकारचे नकारार्थी धोरण बाबासाहेबांच्या साहित्य छपाईस मारक नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासंबंधीन पुढाकार घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देत ५ कोटी ४५ लक्ष रुपयांचा कागद खरेदी करण्यात आला. मात्र २०१९मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या दलित विरोधी धोरणामुळे बाबासाहेबांच्या साहित्याप्रती कुठलिही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे तो […]

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलेली माहिती नवी दिल्ली–  पंतप्रधान गती शक्ती योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गांना स्वीकृती मिळाली आहे. 1.46 लाख किमीचे महामार्ग गती शक्ती योजनेत आता 2 लाख किमीपर्यंत बांधले जाणार आहेत, अशी माहिती रस्ते महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. गती शक्ती योजनेत नवीन महामार्गांच्या बांधकामांनाही […]

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम : अतिजोखीम परिसरांमध्ये आशा सेविका देणार भेट नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिके तर्फे नागपूर शहरामध्ये क्षयरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार ६ ते २६ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये शहरात ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या काळात शहरातील अतिजोखमीच्या स्थळी, परिसरांमध्ये मनपाच्या आशा स्वयंसेविका भेट देतील व नागरिकांना क्षयरोगाची […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com