– नावीन्यपूर्ण उपक्रमात महाराष्ट्र नेहमीच पुढे मुंबई दिनांक १७: जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतूकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट […]

-ऑनलाईन अर्ज करण्यासाठी करणार मदत   चंद्रपूर, ता. १७ : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड19’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज भरण्‍याकरीता मृत व्यक्तीच्या नातलगांना साहाय्य करण्यासाठी आणि सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत  हेल्पडेस्क स्थापन करण्यात […]

मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात ‘महारेरा‘चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर सोमवार दि. २० आणि मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार तेजस वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली आहे. […]

अमरावती  : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या 8 नव्या प्रवक्त्यांची नियुक्‍ती करुन त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. दैनिक विदर्भ मतदारचे संपादक व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. दिलीप एडतकर यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे,भावना जैन, निजामुद्दीन राईन,गोपाळ तिवारी, डॉ. सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील आणि भरत सुरेश सिंह यांचीही प्रवक्तेपदी […]

रामटेक – प्रभु श्री. रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या अशा रामटेक स्थित कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलसचिव पदावर रामटेक निवासी डॉ.रामचंद्र जोशी यांची कुलसचिव म्हणून नियुक्ती झाली.  रामटेक वासियांकरिता हा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि उत्साह वाढविणारा आहे.  मा.कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी यांनी विश्वविद्यालयाचा कार्यभार सांभाळला तेव्हापासून म्हणजे मागील चार वर्षापासून विद्यापीठाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे.  सुरूवातीला असलेले 36 संलग्नीत महाविद्यालये […]

नागपुर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर तर्फे कन्हान  ते कामठी येथील कन्हान नदीवर सुरू असलेल्या नवीन पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित कार्यकारी अभियंता श्री नरेश बोरकर यांच्या कार्यालयात धडक देऊन संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल तीव्र आक्षेप घेत  तातडीने या पुलाचे काम पूर्ण करून जनतेला रहदारीस खुला करावा अश्या आशयाचे निवेदन  मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत […]

-कोविड मृतकाच्या नातेवाईकांना सेतू केंद्र,ऑनलाईन, क्यूआर कोडची अर्जासाठी उपलब्धता -सोपा अर्ज, तात्काळ प्रतिसाद,महाकोविड१९ रिलीफ डॉट इन संकेतस्थळाचा वापर करा  -मध्यस्थावर करडी नजर, सेतू केंद्रावरील फसवणुकीकडे पोलीसांचे लक्ष – अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या चित्रफितीचे लोकार्पण नागपूर : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह निधी देण्याच्या शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिले. […]

  मुंबई  : महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीमार्फत मराठीतील उत्कृष्ट चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्याचे नियोजन असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.             आज मंत्रालयात फिल्मसिटी संदर्भातील आढावा बैठक‍ आयेाजित करण्यात आली होती. या बैठकीला गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे, अजय सक्सेना, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, आदी उपस्थित होते. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या इंग्रजी खंड ६ चा मराठी अनुवादाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे या मराठी अनुवादित खंडाच्या माध्यमातून त्यांचे विचार ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी भाषेतल्या २२ खंडांचा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे काम समितीने युद्धपातळीवर करावे. या कामासाठी शासन निधी कमी […]

मुंबई  : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे कोविड प्रतिबंधक लस पुरवठा करण्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगास आज सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमामुळे राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरणास गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय […]

– महिंद्राच्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले. त्यानुसार राज्यात 2030 पर्यंत बहुतांश वाहने इलेक्ट्रिक वाहने असतील. असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलीटीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ट्रिओ रिक्षाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत […]

-ग्रीन ॲशकॉन आणि ग्रीन बिल्डकॉन २०२१ या त्रिदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे  उदघाटन  -उद्या  फ्लाय  ॲश  विषयक तांत्रिक सत्रांचे  नागपूर – विनाविज विकास नाही आणि वीज म्हटलं की कोळसा आलाच. परंतु कोळसा हे जेवढे आपल्यापुढील आव्हान आहे तेवढेच त्यातून उत्पादित होणारी फ्लाय ॲश ही काळाची गरज नसून आपल्यासमोर आलेली संधी आहे. आपल्या हातून घडलेल्या प्रदूषणाला, निसर्गाकडून घेतलेल्या संसाधनाची परतफेड म्हणून हे उपउत्पादन […]

   नागपुर –    भारतीय जनता पार्टीच्या सहकार आघाडी, वैद्यकीय आघाडी, स्वच्छ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व प्रभाकरराव दटके यांच्या जयंती निमित्त  भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व प्रभाकरराव दटके यांचा जीवनकार्यावर आधारित व्याख्यान, आणि कोविड योद्धा सन्मान सोहळा काल गुरुवारी शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर महाल,नागपूर येथे संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार श्री नागो गाणार सर तर […]

भंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा महाविद्यालय मार्फत कार्यक्रमाद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. नुकतेच नूतन कन्या महाविद्यालय भंडारा येथील बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयाद्वारे पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या पथनाट्यमध्ये मतदान, मतदानाचा हक्क, मतदारांची कर्तव्य याबाबत नाटकीय सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण अकरा विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. […]

– “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आणखी दोन दिवस राहणार प्रदर्शन   – महापौर आणि उपमहापौरांनी केली इलेक्ट्रिक बाईकची टेस्ट राईड; आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी दिली भेट  चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने माझी वसुंधरा अभियान २.० व राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत गुरुवार, दिनांक १६ डिसेंबर रोजी आयोजित “इलेक्ट्रिक वाहने व सौर उपकरण प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १६ डिसेंबर) रोजी २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने १० झोन मधील ५१ पतंग दुकानांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

नागपूर : भारतीय जीवन बिमा निगम कि प्रमुख संघठन नागपूर डिवीजनल एल आय सी एम्पलाईज यूनियन ने आज बॅंक कर्मचारीयों कि  दो दिवसीय हडताल को समर्थन देते हुये जीवन बिमा मुख्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया. सभा को संबोधित करते हुये अखिल भारतीय जीवन बिमा कर्मचारी असोसिएशन के उपाध्यक्ष काॅ अनिल ढोकपांडे ने केंद्र सरकार कि आर्थिक व मजदूर  विरोधी […]

नागपूर  : नवउद्योजकांना बोलते करा, मनात जिद्द व हिंमत असली तर कोणत्याही क्षेत्रात प्रगती शक्य आहे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात महिलांचे सबळीकरण करण्यासाठी महिला नवउद्योजक समोर आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सुध्दा त्यांनी जिद्द व हिंमतीच्या जोरावर अनेक उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले असून समस्यांना सामोरे जावून उद्योग […]

– आता प्रत्येक भारतीयाने नागरिक या नात्याने कर्तव्यास सिद्ध व्हावे – स्वातंत्र्याचा अमृत महोतसव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम -जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन नागपूर : सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याची, स्वत:च्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची हिम्मत संविधानाने दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आता कर्तव्यपूर्तीने सिद्ध होण्याचा संकल्प सामान्य माणसाने करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी आणि […]

राज्य बास्केटबॉल स्पर्धा पक्षपाती? नागपुर – औरंगाबाद मध्ये 12 तारखे पासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत (अंडर-18) नागपूर ची टीम कोचच्या पक्षपाती नीतीमुळे पराभुत झाल्याचा आरोप करण्यात आला. 12 डिसें पासून सुरू झालेल्या नागपूरच्या टीमला पुण्याने हरविले. 13 ला नागपूरने औरंगाबाद ला हरविले. 14 ला साताऱ्याला हरविले. 15 ला मुंबई सोबत झालेल्या कॉर्टर मध्ये नागपूर ची टीम पराभूत झाली. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com