महिनाभरात ९ हजार ३६३ मालमत्ताधारकांनी घेतला शास्तीचा लाभ चंद्रपूर, ता. १४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून ही योजना सुरु असून, मंगळवार, ता. १५ फेब्रुवारी रोजी शेवटची मुदत आहे. मालमत्ता कराचा भरणा करून शास्तीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान, महिनाभरात […]

पर्यावरण मंत्री-आदित्य ठाकरेंनी आशांच्या शिष्टमंडळास भेटण्यास नकार नागपुर – निवासी जिल्हाधिकारी -विजया बनकर यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात राजेंद्र साठे,प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, अंजू चोपडे, कांचन बोरकर उपस्थित होते. आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे  राज्य स्तरावर आशा व गटप्रवर्तक विविध मागण्यांना घेऊन एक दिवसाच्या संप करून संविधान चौकात शेकडो आशा-गट प्रवर्तक यांनी लाटणे आंदोलन केले. मार्च २०२० पासून […]

गावात दहशतीचे वातावरण – बेला, प्रतिनिधी उमरेड – उमरेड तालुक्यातील बेला गावाजवळ असलेल्या गट ग्रामपंचायत बोरगाव लांबट येथे एका व्यक्तीने कार्यालयात फोन केल्याची घटना 13 तारखेच्या मध्यरात्री घडली. यामुळे गावात दहशतीचे वातावरण असून सरपंचाच्या तक्रारीवरून बेला पोलिसांनी गावातीलच इन्‍द्रपाल भगवान कंगोल या पस्तीस वर्षाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव लांबट येथे राहणारा  कंगोल याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत […]

मोहगाव झिल्पी येथे श्री सिद्धिविनायकाची प्राणप्रतिष्ठा नागपूर, ता. १४ : देशात मागील काही दिवसांपासून एक धार्मिक पर्व सुरू आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि वाराणसी कॅरिडोर हा संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला. त्यापूर्वी अयोध्या येथे भव्य राम मंदिराची उभारणी सुरू झाली. त्याच मालिकेत संदीप जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले आहे. देशात सुरू असलेले […]

नागपूर –  प्रभाग क्र.१३, एन. आय. टी. गार्डन डागा ले-आऊट येथे नगरसेविका डॉ. परिणीता परिणय फुके यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाचे (STP) आज उद्घाटन नागपूरचे महापौर  दयाशंकर तिवारी जी व आमदार डॉ परिणयजी फुके यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुर शहरात १२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नागपूर महानगर पालिकेद्वारे मंजूर करण्यात आलेले आहे. नगरसेविका डॉ.परिणीता फुके यांनी अथक प्रयत्न व […]

चंद्रपूर,ता. १४ : कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २’ ची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली होती. २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान लसीकरण करणारे सर्व पात्र वयोगटातील व्यक्ती मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होत आहेत. दरम्यान, आता या योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील […]

नागपूर, ता. १४ : नागपूर  महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आवाहनानंतर मनपा निवडणुकीच्या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेबाबत सोमवारपर्यंत (ता. १४) एकूण ११७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सोमवारी शेवटच्या दिवशी ४४ सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून त्यापूर्वी ७३ सूचना प्राप्त झाल्या होत्या.           प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर १ ते १४ फेब्रुवारी […]

नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे,  महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय पुरुष व २३ वर्षाखालील आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा सोमवारी (ता.१४) समारोप झाला.             विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर झालेल्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर.विमला, माजी आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, इन्स्टिट्यूट सायन्सच्या शारिरीक शिक्षण संचालक डॉ.माधवी मार्डीकर, समाजसेवक चंदनसिंग रोटेले, क्रीडा संघटक अजय हिवरकर, प्रवीण मानवटकर, डॉ. सुरजसिंग येवतीकर, डॉ.विवेक शाहु, केतन ठाकरे, विनोद सुरघुसे, निखिल वाहने आदी उपस्थित होते.       यावेळी […]

– नांदगाव तलावाची पाहणी,ग्रामस्थांशी चर्चा – शाश्वत विकासासह पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न नागपूर, दि. 14 : खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधील राख नांदगाव व वारेगाव तलावात टाकण्यात येत असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात राख टाकणे कायमचे बंद केले जाईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. नांदगाव येथील ग्रामस्थांशी चर्चा व ॲश पाँडची पाहणी यावेळी त्यांनी केली. […]

मुंबई, दि. 14  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर.विमला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवरून मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती राखी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.           नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू […]

– वैमानिक प्रशिक्षणाचा प्रारंभ – नागपूर उड्डाण क्लबला आवश्यक सुविधा देणार नागपूर, दि.14 : नागपुरातील उड्डाण क्लबची गौरवशाली परंपरा असून हा क्लब पुनरुज्जीवित झाल्यामुळे विदर्भातील युवकांना विमानउड्डाण प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. नागरी उड्डाण क्षेत्रात जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर […]

नागपूर, दि. 14 :  राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र  बटालियनने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील पथसंचलनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविला ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गगार क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. या पथसंचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र बटालियनचे सात कॅडेट सहभागी झाले होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात […]

मुंबई : एसटी संपासंदर्भात  या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणखी 7 दिवसांची वाढीव मुदत दिली आहे. एसटी विलीनीकरणाचा त्रिसदस्यीय अहवाल सादर करण्यासाठी वाढीव वेळ देण्यात यावी, असा अर्ज राज्य सरकारने केला होता. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही मुदतवाढ दिली आहे. एसटी महामंडळाची राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचारी […]

संताजी सभागृहासमोरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन चंद्रपूर – कोणताही समाज असो वा कोणताही देश गुणवान असेल, त्यावर त्याचं योग्य मूल्यांकन होत असतं. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उत्तम व्यवस्था व्हावी या दृष्टीने डॉ. वासुदेव गाडेगोणे यांनी केलेली धडपड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली साथ, हे त्या समाजाच्या गुणवत्तेसाठी गती देते, असे प्रतिपादन माजी वन व वित्त मंत्री तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार […]

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटना, राजमुद्रा क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित भारतीय पुरुष सॉफ्टबॉल संघासाठी निवड चाचणी स्पर्धेचे शनिवारी (ता. १२) महापौर दयाशंकर तिवारी यांनी सॉफ्टबॉल खेळून उदघाटन केले. विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर पार पडलेल्या उदघाटन कार्यक्रमात क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, मंगळवारी झोन समिती सभापती प्रमिला मथरानी, नगरसेविका संगीत […]

चंद्रपूर महानगरपालिकेच्या व्यायामशाळेचे भानापेठ येथे उद्घघाटन चंद्रपूर – 21 व्या शतकात विज्ञानाची प्रगती होत असली तरी दुसरीकडे संस्काराची अधोगती होत आहे. राज्यात सध्या शरीर बिघडवणारे केंद्र महाविकास आघाडी सरकार उघडत आहे. हे केंद्र आता किराणा दुकानापर्यंत देखील पोहोचले आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होईल. समाजाला शरिर बिघडवणारे नव्हेतर तंदुरुस्त ठेवणाऱ्या केंद्राची गरज असल्याचे प्रतिपादन माजी वित्त नियोजन व वने मंत्री, […]

विविध राज्यातील गुणवंत सॉफ्टबॉल खेळाडूंचे शहरात आगमन नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय पुरुष व २३ वर्षांच्या खालील सॉफ्टबॉल संघ निवडण्यासाठी दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर राष्ट्रीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेचे शनिवारी (ता.११) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.             कार्यक्रमात विशेषत्वाने खासदार डॉ.विकास […]

नागपूर, ता. ११ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे  शहरात ७५ वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्र तयार करण्यात येत आहेत. याच श्रृंखलेमध्ये हनुमान नगर झोन अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सोमवारी पेठ येथील वंदे मातरम् नागरी आरोग्य सुविधा केंद्राचे शुक्रवारी (ता.११) महापौर दयाशंकर तिवारी यांनी लोकार्पण केले.            यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले, ज्येष्ठ नगरसेवक डॉ.रवींद्र (छोटू) भोयर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक आरोग्य अधिकारी […]

नागपूर, ता. ११ :  नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (११ फेब्रुवारी) रोजी १० प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत नाग रोड येथील एन.आय.टी.सभागृह, वेलवसिध्द सभागृह आणि जैन मंदीर सभागृह यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला. कच्चीविसा लकडगंज झोन मधील अशोका ईलिते  यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या […]

नागपूर ता.११ :  प्रभाग क्र.२७ ‘अ’ व नविन प्रभाग क्र. ३० अंतर्गत येणा-या हसनबाग ते स्वातंत्रनगर पर्यंतच्या परिसरात मलवाहिनी टाकण्याच्या कामाकरीता रु. २.५० कोटी मंजूर करण्यात आले. या कामाचे भुमिपूजन मा.श्री. अभिजीत वंजारी, आमदार विधान परिषद यांच्या शुभहस्ते, मा.श्री.तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता, मनपा, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख ‍अतिथी श्री. कमलाकर घाटोळे, प्रदेश महामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या उपस्थितीत दिनांक ११ फेब्रुवारी, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com