कॅन्सरग्रस्त निराधार म्हातारीने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली जीवन यात्रा संपवण्याची याचना

हृदय पिळवुन टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना 

कुही – इंदिराबाई हटवार ८० वर्षीय वृध्द महिला पाचगाव येथील रहीवासी आहे . या म्हातारीला कर्करोगासारखा गंभिर आजार झाला असुन अतिशय भयावह परिस्थितीमध्ये तीचा मुत्युशी संघर्ष सुरु आहे . तिने आपली संपत्ती मुलाच्या नावे केल्यानंतर मुलांनी तिला वाऱ्यावर सोडुन दिले . व तिची देखभाल करण्यास स्पष्ट नकार दिला . या म्हातारीची शारीरिक अवस्था इतकी वाईट आहे की स्वताच्या पायावर उभे होता येत नाही , चालता येत नाही . तिच्या कुंटुबींयाकडुन झालेल्या दुर्लक्षामुळे व अमानवीय व्यवहारामुळे कर्करोगाची जखम इतकी वाढली आहे की आता दुर्गंध यायला लागला आहे . तीला होत असलेल्या वेदना असहनीय आहे . अशा बिकट परिस्थितीमध्ये तिच्यावर औषधोपचार करने तर दुर साधे जेवन व घालण्यातरीता कपडेसुध्दा मिळत नाही .तिला मरण्यासाठी घरापासून लांब एका खोलीत ठेवले आहे .म्हणुन या म्हातारीने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल मला (राजेश बावनकुले )माहीती दिली .

या आधारावर तिच्या मुलांची पोलिस स्टेशन कुही येथे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे . तसेच न्यायालयात केस दाखल करण्यात आली असुन कायदेशीर मार्गाने तिच्या वाट्याला आलेली शेती परत घेण्यात येणार आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे या संपुर्ण प्रकरणाची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे सुध्दा करण्यात येणार आहे व दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येणार आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

Tue Nov 30 , 2021
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवारी (२९ नोव्हेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ४१९४८ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९३,३३,०००/- चा दंड वसूल केला आहे.           शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका अदयापही टळला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!