अमरदिप बडगे, प्रतिनिधी
तिरोडा पोलीस व मेरिटोरिअस स्कूल यांचा संयुक्त उपक्रम
गोंदिया – तिरोडा पोलीस तथा मेरिटोरिअस स्कूल तिरोडा यांचे संयुक्त विद्यमाने तिरोडा शहरात विद्यार्थ्यांची सायकल रॅली काढण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय चा जयघोष करीत काढण्यात आली होती.
सध्या सर्वत्र शासनाच्या निर्देश नुसार भारतीय स्वात्रंत्त्याच्या 75 व्या अमृत महोत्सवनिमित्त हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात योगेश पारधी पोलीस निरीक्षक, मेरिटोरिअस स्कूल चे प्राचार्य तुषार येरपुडे, शिक्षक रत्नाकर येरपुडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
आज 9 ऑगस्ट ला तिरोडा शहरामध्ये तिरोडा पोलीस व मेरिटोरिअस स्कूल सोबत सायकल रॅली श्री संत गजानन महाराज मंदिर येथून काढून अवंतीबाई चौक, पोलीस स्टेशन, गांधी चौक, मोहनलाल चौक, गुरुदेव चौक, भूतनाथ मंदिर मार्गे मेरिटोरिअस स्कूल येथे संपन्न झाली.या कार्यक्रमामुळे शहरात देशभक्ती ची भावना निर्माण झालेली आहे. या वेळी पोलीस स्टेशन तिरोडा येथील पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि ईश्वर हनवते, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार, मेरिटोरिअस स्कूल चे प्राचार्य तुषार येरपुडे, शिक्षक रत्नाकर लांजेवार, उपवंशी, आकाश खंदारे आणि शाळेचे विद्यार्थी आप आपल्या सायकल सह उपस्थित होते.