चैतन्य जागविणाऱ्या महारॅलीला उत्तम प्रतिसाद

भंडारा : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा परिषद, माविम व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने आज भंडारा शहरात महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी 10 च्या सुमारास जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या महारॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेल्या या रॅलीने नगरपरिषद औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या मार्गावरूनअखिल सभागृहात प्रवेश केला. या रॅलीत साधारण 300 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता. या रॅलीदरम्यान लेझीमची प्रात्यक्षिके, माता जिजाऊ ,राणी लक्ष्मीबाईच्या वेशभुषेत महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अखिल सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. त्यात गीत, नृत्ये, भारूड, लावणी आदींव्दारे सभागृह दणाणून गेले. त्यानंतर जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा व वैयक्तिक स्पर्धांच्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर जिल्ह्यातील मान्यवर महिला अधिकारी नुतन सावंत, संघमित्रा कोल्हे, शैलजा वाघ दांदळे, मनिषा कुरसुंगे, सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन

Thu Mar 10 , 2022
कन्हान : –   जागतिक महिला दिना निमित्त कन्हान शहर महिला काँग्रेस कमेटी व राष्ट्रीय कोयला खदान मजदुर युनियन (इंटक ) तसेच विनय यादव मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमा ने हनुमान नगर पाणी टाकी परिसरात श्रम कार्ड, वोटिं ग कार्ड, हेल्थ कार्ड तसेच शरीराच्या हाडाची तपासणी निशुल्क शिबीराचे आयोजन करून जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.          […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com