गडचिरोली,(जिमाका)दि.25: राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र , मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक 22 एप्रिल 2022 अन्वये निधन,राजीनामा,अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील दिनांक 22 एप्रिल 2022 रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य्ा पदांकरीता पोट निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार निवडणूकीचे टप्पे व टप्पा सुरु करण्याची व पूर्ण करण्याची तयारी पुढील प्रमाणे असेल. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा (गुरुवार), दिनांक 28 एप्रिल 2022, तर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी (गुरुवार) दिनांक 28 एप्रिल 2022 ते बुधवार दिनांक 4 मे 2022 पर्यंत, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे (गुरुवार) दिनांक 5 मे 2022 आहे.
मतदार यादी कार्यक्रमांतर्गत प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादीवर मतदार /नागरिकांकडून हरकती व सुचना मागविण्यात येत आहे. तरी हरकती व सुचना संबंधीत तहसिलदार यांचेकडे दाखल करण्यात यावे असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली समाधान शेंडगे यांनी केले आहे.
रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदांकरीता पोट निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com