नागपूर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत दक्षिण नागपुर बसपाने आज दि. 23 जानेवारी ला काढलेल्या जनसंपर्क अभियानात महाराष्ट्र प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, महाराष्ट्र प्रदेश मा सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, नागपूर जिल्हा प्रभारी महिला विंग वर्षाताई वाघमारे, नागपुर जिल्हा सचिव नितिन वंजारी, नागपूर शहर प्रभारी शंकर थुल, शहर महासचिव विलास मून, दक्षीण नागपुर विधान सभेचे उपाध्यक्ष प्रीतम खडतकर, महासचिव विकास नारायणे, कोषाध्यक्ष सचिन कुंभारे, सचिव सुमित जांभूळकर, बिव्हीएफ चे संगीतबाबू इंगळे, माजी नगरसेवक अजय डांगे, हेमंत बोरकर, धनराज हाडके, रवी पाटील, राजकुमार उके, कृष्णा निकोसे, राजू डांगरे, नालंदाताई पाटील, ममताताई बडोले, अर्चनाताई फुलकर, रेणूकाताई गजभिये, लाडेताई आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
16 जानेवारी पासून महापौर बनाओ अभियान अंतर्गत सुरू झालेल्या जनसंपर्कद्वारे आतापर्यंत चंद्रमनी नगर, कुंजीलाल पेठ, नालंदा नगर, इंदिरा कॉलोनी, चंद्रनगर, बालाजी नगर, नाईक नगर, रिपब्लिकन वसाहत, मेडिकल कॉलोनी, वसंत नगर, प्रगती नगर न्यू कैलास नगर, श्रमजीवी नगर शाहू कॉलोनी, सावित्रीबाई फुले, एन शिवराज नगर आदी वसाहतीतील नागरिक व मतदारांशी जनसंपर्क करण्यात आला

याप्रसंगी बसपा कार्यकर्त्यांनी “बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया है”, “बाबा आपका मिशन अधुरा बीएसपी करेगी पुरा”, “जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने-कोने मे”, “बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशाण”, जो बहुजन की बात करेंगा वह दिल्ली से राज करेंगा”, “एससी एसटी ओबीसी भारत के है मूल निवासी”, “ओबीसी भाई जागेगा चोर लुटेरा भागेगा, “बहुजन भाई जाग जाओ देश मे अपना शासन लाओ”, जो जमीन सरकारी है वह जमीन हमारी है,” “ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे”, “महापुरुषोके सम्मान मे बीएसपी मैदान मे” “संविधान के सम्मान मे बीएसपी मैदान मे”, “व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा”, रोजी रोटी दे न सकी वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है वह सरकार बदलनी है”, “व्होट की रक्षा कैसी हो बहू बेटी जैसी हो” आदी घोषणा देत-देत बसपा कार्यकर्ते वसाहतीत फिरले
जनसंपर्क अभियानाच्या आठव्या दिवशी आज २३ जानेवारी ला दक्षिण नागपुरातील सावित्रीबाई फुले नगरातील तथागत बुद्धांना वंदन करुन, बाबाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन प्रदेश सचिव रंजनताई ढोरे, मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी ह्यांनी सुरुवात केली. सावित्रीबाई फुले नगर व एन शिवराज नगरातील प्रत्येक रांगेत घरोघरी जाऊन बसपा नेते व कार्यकर्त्यांनी मतदार व नागरिकांशी जनसंपर्क केला. यावेळी बसपाला नागरिकांचे भरपूर समर्थन असल्याचे दिसून आले.