नागपूर – पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या द्वारे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रमात बालिकांच्या सन्मानार्थ शैक्षणिक व स्वास्थ विषयक योजनाच्या उपक्रमावर आधारित भाजप वैद्यकीय आघाडी व भाजप मध्य नागपूर महिला मोर्चा द्वारा भाजप शहर अध्यक्ष आमदार प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय बालिका दिनानिमित्य वकिलपेठ येथे लहान बालिकांची आरोग्य तपासणी व त्यांना कुपोषण व स्वच्छतेच्या विषयी मार्गदर्शन करून इम्म्युनिटी किट औषधी व मास्क तसेच स्वतंत्र भारताच्या महापुरुषांचे पुस्तकं वाटप करण्यात आलं.या महापुरुषांचे चरित्र वाचून त्यांच्या प्रेरणेने बालिकांच्या मनात देशभक्तीचा जागर निर्माण व्हावा या सदहेतूने भारतीय जनता पार्टीच्या मध्य नागपूर महिला मोर्चा अध्यक्ष सौ रेखाताई निमजे व भाजप वैद्यकीय आघाडी अध्यक्ष बालरोगतज्ञ डॉ गिरीश चरडे, यांच्या हस्ते तर डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ कोमल काशीकर, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या आरोग्य तपासणीत 45 हुन अधिक मुलांचा सहभाग होता. या वस्तीतील महिला,नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष श्री राजुजी तितरे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री अमोल चंदनखेडे,प्रभागाच्या महिला आघाडी अध्यक्ष कल्पनाताई आत्राम, महामंत्री संगीताताई नाईक ,श्री संजय तिडके आदी भाजप पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
भाजप द्वारे राष्ट्रीय बालिकादिन उत्साहात संपन्न…
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com