नागपूर – भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नागपुर शहर तर्फे नागपूर नगरी संस्थापक गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन केले. गोंड राजे बख्त बुलंदशहा यांनी नागपुरची स्थापना जवळ जवळ ३२१ वर्षांपूर्वी सन १७०२ मध्ये यांनी प्रथम केली होती. बख्त बुलंद शाह देवगढ़ येथून नागपुरला आले अणि येथील १२ गाव एकत्र करुन त्यांनी नागपुर नगरीची स्थापन केली. या १२ गावांमध्ये त्यावेळी राजापुर, रायपुर, हिवरी, हरिपुर, वानडे, सक्करदरा, आकरी, लेंडरा, फुटाळा, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी, शामिल होते. कालांतराने या काही गावांचे नाव बदलविण्यात आले. त्यांनी गावांचे मुख्य मार्ग जोडले आणि अवश्यकतेच्या अनुसार शहरात बाजारपेठ निर्माण केले. या प्रकारे नागपुर शहराचा हळु हळु विकास होत गेला. अश्या प्रकारची माहिती यावेळेस भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या तर्फे देण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने माजी महापौर व राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या माजी सदस्या ईवनाते, राजे वीरेंद्र शहा, रविद्र पेंदाम, राजेश मरसकोले, राजुजी भलावे, बबिता धुवेँ, पदमाताई मसराम, प्रशांत कुमरे, शिवराम वाढवे, मोनु धुवेँ, अरविंद गेडाम, महेंद्र उईके, दिलीप मडावी, ललीत पवार हे मान्यवर उपस्थित होते.