बिडगाव येथे भूमिपजन सोहळा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 01:- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव येथे आज 1 जून ला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगा एस आर फंडा अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे आणि कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या विशेष प्रयत्नातून बिडगाव येथे भूमिगत नाली व खडीकरण रस्ता एकूण मंजूर निधी २२ लक्ष रु. चे भूमिपूजन सत्तापक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर प्रा अवंतिका लेकुरवाडे आणि पंचायत समिती उपसभापती आशिष व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य सविताताई पंचबुधे, ग्रा.पं. सदस्य मनिषताई कुंभरे, सतीश बरडे, धनराज तलमले, राजेश निशाणे, जनार्दन बावनकुळे, मोरेश्वर घारपेंडे, सचिन ढोमने, अक्षय मल्लेवार, ईश्वर तलमले, सुधाकर कातुरे, उपासराव बावनकुळे, नाना राऊत, कातूरे ताई, शहारे ताई आणि समस्त नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मोहदी धरण बनविल्यास ड्राय झोन नरखेड भागा च्या शेती सिंचन व पाण्याचा प्रश्न सुटणार- जाधव

Wed Jun 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कमी खर्च धरणाने मध्यप्रदेश च्या गावातील पिण्याचा पाण्याची समस्या संपणार. कन्हान : – नागपुर जिल्हयातील नरखेड तालुक्यातील ड्राय झोन परिसरातील मध्यप्रदेश सिमे जवळ महारा ष्ट्रातील मोहदी दळवी (हेटी) नाला येथे नविन धरण बवविण्याकरिता शेतक-यांच्या मागणीने रामटेक क्षेत्र शिवसेना माजी खासदार प्रकाश जाधव हया नी भेट देऊन सभोवतीच्या ग्रामस्थाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या व नरखेड तालुक्यातील शेती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!