कामठी – दिनांक 23.07.2023 परमात्मा एक व्यसन मुक्ती चर्चा स्थळ सातगाव या ठिकाणी परमात्मा एक चे वर्षातून मोठ मोठे कार्यक्रम पार पडतात व या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसमुक्तीच्या आधारावर मार्गदर्शन होत असते, याठिकाणी भवनाची जागा कमी पडत असल्यामुळे त्याकरिता खासदार कृपालजी तुमाने, रामटेक लोकसभा क्षेत्र, साहेबांनी सभा मंडप बांधकामाकरीता 10,00,000 (दहा लक्ष रुपये) निधी मंजूर केला आहे.
या बांधकामाचे भूमिपूजन समारंभ सातगाव ता.हिंगणा जि. नागपूर येथे दि. २३/०७/२०२३ ला पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृपालजी तुमाने लोकप्रिय खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र यांच्या उपस्थिीमध्ये भुमी पुजनाचं कार्यक्रम समारंभ पार पाडला.
प्रमुख अतिथी- विलासराव बोमले माजी उपसभापती पं.स. हिंगणा, योगेशजी सातपुते सरपंच सातगाव ग्रा.पं, उपसरपंच सौ. प्रविनाताई शेळके, दौलतराव दंडारे मार्गदर्शक परमात्मा एक, भीमरावजी मोरे जेष्ठ सेवक परमात्मा एक, विश्वनाथजी मेश्राम, नरेंद्रजी गुल्हाने, ग्रा.पं. सदस्य श्री सुरेंद्रभाऊ सुरणकर, सागरजी मोहितकर, सुनीताताई भुसारी, सहयोगी- राजकुमारजी मोरे, राजू गोखरे,सचिन भुसारी, बाळकृष्णजी वाघमारे, विनोदजी जांभुळकर, रामेशजी निंदेकर, ज्ञानचंदजी देवळे, आकाश भोमले, अभय वाटकर, अविनाश बाळबुधे, शुभम बाळबुधे, पवन चौधरी, प्रफुल बाळबुधे, किरण वाटकर, गुरू चिकटे यांच्या उपस्थिती समारंभ संपन्न झाला.