भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
विदर्भ विभाग नागपूर जिल्हाची गरजूंना एक हात मदतीचा
कामठी ता प्र 16:-नागपूर ग्रामीण अंतर्गत बेसा- बेलतरोडी येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा गरजू लोकांना मदत व्हावी या उदार भावनेतून आज दिनांक 16/05/2022 सोमवार ला भटके विमुक्त हक्क परिषद विदर्भ विभाग नागपूर जिल्हा चा वतीने काही मदतीचा हात पुढे करत गरजूंना साडी, टॉवेल, शर्ट पिस,कपडे, बिस्कीट, पाणी बॉटल्स, इत्यादी वस्तू व धान्य वाटप करण्यात आले . भटके विमुक्त हक्क परिषद नागपूर जिल्हा पदाधिकारी व संघटक तसेच स्थानिक बांधवांनी व इतर मान्यवर व्यक्तीनी गरजूंना मदत केली. तेथील सत्य परिस्तिथी बघता भयावह परिस्थिती लक्षात आली भर उन्हात एवढा संसार उध्वस्त होऊन घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नाही ती पाहून अश्रू अनावर झाले एवढीच अपेक्षा शासन राज्यकर्त्यांना आहे की त्यांनी तात्काळ मदत करावी. याप्रसंगी महेश गिरी (विदर्भ अध्यक्ष),प्रविण पाचगे( उपाध्यक्ष नागपूर),गोवर्धन बडगे ( उपाध्यक्ष नागपूर), शंकरजी काळे (ज्येष्ठ मार्गदर्शक), नितेश पूरी ( भंडारा जिल्हा अध्यक्ष), विजय आगरकर (सचिव नागपूर),अंकित पवार ( संघटक नागपूर), अशोक बागुल, अतुल भिसे, लोकेश पवार, मयूर जूनघरे, अविनाश पंचबुढे, अमिता उर्कुदे, सविता मेश्राम, पदमाताई पवार,अमोल राठोड , इतर समस्त भटके विमुक्त हक्क परिषद परिवार उपस्थित होते.या सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल विदर्भ अध्यक्ष महेश गिरी यांनी मनपूर्वक आभार मानले .
Box:-आम्ही आता जीवन जगायचे कसे? भटके विमुक्त हक्क परिषद ची पदाधिकारी परिस्तिथीची पाहणी करत असताना एक आजीबाई दिसल्या त्याचे नांव सौ. कमलाबाई रमेश इंगळे त्यांचें वय अंदाजे 85 असेल त्यांनी आम्हाला बोलावले व प्रश्न विचारला आम्ही आता जीवन जगायचे कसे? त्यांचा संसार उध्वस्त झाला होता होत नव्हतं ते सारं जळून नष्ट झाल होत त्यांचें पती हॉस्पिटल मध्ये होते आणि घरात शौचालय बांधण्यासाठी पंधरा हजार रुपये ठेवले होते ते सारं जळून गेले होते हे सगळं ऐकून फार वाईट वाटत होते त्यांना काही मदत पण ती शुल्लक होती शासनाने व राज्यकर्त्यांनी त्वरित. मदत करावी व त्यांची पुन्हा घरे बांधून द्यावी हिच सदिच्छा — महेश बबनराव गिरी ( विदर्भ अध्यक्ष – भटके विमुक्त हक्क परिषद)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

बदलत्या काळानुसार फॅक्स मशीन झाल्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर

Mon May 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 16:-आजच्या स्पर्धात्मक युगात मोबाईल क्रांती पसरली असून इंटरनेट आणि मोबाईल च्या अतिवापराने अत्यंत महत्वाचा जाणारा फॅक्स मशीन आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने पाठविलेले संदेशपत्र म्हणजे फॅक्स होय.शासकीय, निमशासकीय कार्यालय, रुग्णालय, व्यावसायिक प्रतिष्ठाने आदी अनेक ठिकाणी महत्वाची माहिती, घटना, तक्रारी,निवेदन, शासकीय दस्तावेज, अपडेट माहिती, सांख्यकीय माहिती किंवा अन्य काही कमी वेळात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!