संदीप कांबळे,कामठी
कामठीत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी 14 व 15 मे ला दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन
कामठी ता प्र 11- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे दिव्यांगासाठी एडीआयपी योजना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूर चे समाज कल्याण विभाग,जिल्हा आरोग्य विभाग , एएलआयएमसीओ कानपुर व सीआरसी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी 29 एप्रिल ते 27 मे 2022 पर्यंत राबवित येत असलेल्या मोफत सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमा अंतर्गत कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील एमटीडीसी सभागृहात 14 व 15 मे ला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची तपासणी करण्यात येणार आहे तेव्हा दिव्यांग लाभार्थी तसेच 60 वर्षेवरील ज्येष्ठ नागरिकांनी या दोन दिवसीय शिबिराचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आव्हान बीडीओ अंशुजा गराटे यांनी केले आहे.
दिव्यांग्यासाठी आवश्यक कागदपत्रे /पात्रता(दिव्यांग व्यक्तींना कोणतीही वयोमर्यादा नाही)
-जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले 40 टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
—मासिक उत्पन्न 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक
—पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड
—दोन पासपोर्ट फोटो
–दिव्यांगांना देण्यात येणारे लाभ
–चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, व्हील चेअर, कॉलीपर्स, शैक्षणिक संच, स्मार्ट फोन(दृष्टिहीन करिता),संडास खुर्ची, कुबडी, तीनचाकी खुर्ची, बॅटरीवाली ट्रायसायकल, , कृत्रिम अवयव, ब्रोल कोट, स्मार्ट केन(दृष्टीहीनकरिता)
—वयोश्री योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे /पात्रता
–वय 60 वर्षापेक्षा जास्त
–वार्षिक उत्पन्न 1 लक्ष 80 हजार पेक्षा कमो
–आधार कार्ड
–उत्पन्नाचे प्रमाणपत्र /बीपीएल कार्ड
—पासपोर्ट फोटो (4)
–देण्यात येणारी उपकरणे(60 वर्षापेक्षा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात
—चालण्यासाठी काठी, श्रवणयंत्र, दाताची कवठी, कमरेचा पट्टा, चष्मा, कुबडी, तीनचाकी खुर्ची, संडास खुर्ची, कमरेचा पट्टा.