बारामती तालुक्यातील 6 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या 316 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

  मुंबईदिनांक 06 : बारामती मतदारसंघातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या 316 कोटी 87 लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेचे पत्र उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले.

            ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत बारामती (जि. पुणे) तालुक्यातील सहा  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या 316 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांना ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (65.08 कोटी)सुपे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (57.98 कोटी)लोणी भापकर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (57.58 कोटी)गोजुबावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (51.15 कोटी)कटफट प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (64.38 कोटी) आणि थोपटेवाडी लाटे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (20.70 कोटी) अशा एकूण सहा योजनांच्या कामांचा समावेश आहे. 

            राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कार्यरत आहे. या योजना वेळेवर पूर्ण होतीलयादृष्टीने सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्याची माहितीही श्री. पाटील यांनी दिली.

            दरम्यानजानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा) -10 कोटी रुपये चिंचोली व 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा)- 88 कोटी 35 लाखपाडळी व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (ता. जि. बुलढाणा)- 16 कोटी 09 लाख,  178 गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद)- 307 कोटीतेल्हारा व 69 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला- 148 कोटी 43 लाख रुपयेघाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा)- 18 कोटी 78 लाख रुपये आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरीजि. नाशिक)- 22 कोटी रुपये निधीच्या या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम

Thu Jan 6 , 2022
 नवी दिल्ली, दि. 6  : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.             जनसंपर्क अधिकारी तथा प्र.उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांनीही आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.             आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com