संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा परमेश्वराप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .यानिमित्ताने बकरे, मेंढ्या आदींची मोठ्या प्रमाणात कुर्बानी देण्यात आली तर यावर्षी बकऱ्यांच्या बाजारात सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ईद निमित्त कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील पटांगण इदगाह येथे सकाळी साडे आठ वाजता मौलाना मसुद यांच्या नेतृत्वात अनुयायांच्या मुख्य उपस्थितीत सामूहिक नमाज पठण करण्यात आले.याप्रसंगी सामूहिक नमाज पठणासाठी 500 च्या आत अनुयायांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच शहरातील 42 मस्जिद मध्ये सुद्धा नमाज अनुयायांनी नमाज पठण केले.या इदगाह वर सामूहिक नमाजाचे अधिपत्य मौलाना मसूद यांनी केले .
सदर इदगाह मध्ये सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर उपस्थित समस्त मुस्लिम अनुयायांना उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी गळाभेट देऊन बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आजचा आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही पर्व एकाच दिवशी आल्याने दोन्ही पर्व कौमी एकतेच्या वातावरणात पार पडावे यासाठी पोलीस विभाग विशेष लक्ष केंद्रित करून होते तर दरवर्षी ईद निमित्त नेमलेल्या इदगाह येथे प्रमुख राजकीय नेते मंडळी उपस्थिती दर्शवून अनुयायांना ईद च्या शुभेच्छा देतात मात्र यावर्षी या परंपरेला ब्रेक लागला असून यावर्षी बकरी ईद निमित्त इदगाह येथे एकाही राजकीय नेते पुढारी मंडळींनी उपस्थिती दर्शविली नव्हती हर इथं विशेष!