संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-1 लक्ष 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 26 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गा चौकात दोन भामट्या महिलानी एका 72 वर्षीय वृद्ध महिलेला 5 हजार रुपये महिना पगार मिळणार असे आमिष देऊन तिच्या गळयातील व कानातील सोन्याचे दागिने किमती 24 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला असता यातील फसवणूक झालेल्या वृद्ध महिला नामक शकुंतला भानुदास शंभरकर रा भीमनगर कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात महिले विरुद्ध भादवी कलम 420,170,34 अनव्ये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिले असता जुनी कामठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तर्कशक्तीच्या आधारावर आरोपीचा शोध लावण्यात यश गाठले असून या गुन्ह्यातील तीन आरोपीना अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो किमती 50 हजार रुपये व 65 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लक्ष 15 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक आरोपी मध्ये ऑटोचालक श्याम मेश्राम वय 45 वर्षे रा रामटेके नगर, आजनी नागपूर, तसेच मनीषा उर्फ छाया अनिल खोब्रागडे वय 35 वर्षे रा आजनी नागपूर व माया संजय चहांदे वय 38 वर्षे रा बेलतरोडी नागपूर चा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी वृद्ध महिला ही स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक मधून पायदळ जात असता सदर अटकेत असलेल्या दोन आरोपी महिला तीन चाकी ऑटो क्र एम एच 31 डी एस 2287 मध्ये बसून येऊन पीडित फिर्यादी वृद्ध महिलेला ऑटोमध्ये बसवून स्वतःला सरकारी कर्मचारी असल्याचे बतावणी करून सरकार कडून प्रति महिना 5 हजार रुपये महिना मिळणार असल्याचे आमिष देऊन फोटो काढतेवेळी तुमच्या गळयात असलेली सोण्याची साखळी व कानातले टॉप्स दिसल्यास महिना लागू होणार नाही असे सांगून तिचे सोन्याचे दागिने काढून घेत तिला उप्पलवाडी जवळ ऑटो मधून खाली उतरवून 24 हजार रूपयाची आर्थिक फसवणूक केली होती यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी गुन्हयातील आरोपीस अटक करून 1 लक्ष 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी सारंग आव्हाड,एसीपी संतोष खांडेकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ किशोर मालोकर,गावंडे,श्रीकांत भिष्णुरकर,अंकुश गजभिये,अश्विन चहांदे,विवेक दोसेटवार यांनी केली .