रामटेक :- 74 वा राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिन साजरा करण्याकरिता पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे अध्यक्षतेखाली तसेच सहायक समादेशक प्रमोद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसह स्व. श्री घनश्याम किंमतकर येथिल भव्य हॉल मध्ये नागरीक, शाळा, महाविद्यालय चे विद्यार्थी यांचे करिता राज्य राखीव पोलीस बलाचे कार्यपध्दती, विविध शस्त्राचे प्रर्दशने, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडुन आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध विषयांवरील प्रात्याक्षिक व त्यांचे व्याख्यान तसेच मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डरचे सादरीकरण करण्याकरिता रामटेक क्षेत्रातील पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कृषी मित्र अनंतकुमार चानेकर, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, उपविभागीय अधिकारी राजेंद्र चव्हाण , तहसीलदार बाळासाहेब मस्के , शासकीय प्रसिध्दी संचालक हेमराज बागुल ,समर्थ शिक्षण मंडळ रामटेक चे सचिव ऋषी किमंतकर , पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर , जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे , तंटामुक्ती चे अध्यक्ष चिचाला मिताराम सव्वालाखे ,नाडीसीको बँक चे माजी संचालक डॉ.रामसिंग सहारे सह मान्यवर उपस्थित होते.
या जनजागृती अभियानांचा फायदा विद्यार्थी, शिक्षक, गावकरी, प्रशासकीय यंत्रणा यांना स्वतःचे रक्षण इतरांचे रक्षण व आपत्ती व्यवस्थापनात, शोध व बचाव कार्यात सुलभ व सुकर प्रयत्न करण्यास प्रेरित केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनि मनोज मोहोड यांनी केले…..