संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
निर्णयाचे शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत
कामठी ता प्र 1:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा नागपूर ग्रामीण जिल्हाप्रमुख पदी शिवसेना नेते देवेंद्र गोडबोले यांची नियुक्ती झाल्याची बातमी आज सकाळ सामना या वृत्तपत्रात झळकली व जिल्ह्यातीत शिवसैनिकात उत्सहाचे वातावरण होते.
दिवसभर देवेंद्र गोडबोले यांच्या कार्यलयात अभिनंदन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती. मौदा कार्यालयात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक गोळा झाले होते व सर्वांनी जल्लोषात साहेबांचे अभिनंदन केले.
गद्दारांना गाडून शिवसेनेचा भगवा रोवणार असी शपथ यावेळी हातात मशाल घेऊन देवेंद्र गोडबोले यांनी शिवसैनिकांसोबत घेतली…