नाशिक येथील अमोल इगे हत्येप्रकरणी दोषारोप पत्र दाखल करून कडक कारवाई करणार – गृह राज्यमंत्री सतेज पाटील

  मुंबई  : नाशिक येथे युनियनच्या वादातून अमोल इगे या युवकाचा खुन झाला. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या हत्येचा तपास करत पोलीसांनी घटनेच्या दिवशीच आरोपीस अटक केली असून, या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करून चौकशीअंती दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभेत सदस्य सिमा हिरे यांनी नाशिक शहरात अमोल इगे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यास गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिले.

            श्री. पाटील म्हणाले, अमोल इगे यांची नाशिक येथे हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी दुपारी पोलीसांनी आरोपीस भिवंडी येथून अटक केली.  सद्य स्थितीत विनोद बर्वे या आरोपीस न्यायालयीन कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. अमोल इगे यांनी जर मृत्युपूर्वी सुरक्षा मिळण्यासाठी पत्र दिले असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई न केलेल्या पोलीस अधिका-यांवरही पोलीस मॅन्युअल प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

            या लक्षवेधीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

'दिलखुलास' कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. खुशपत जैन यांची मुलाखत

Sat Dec 25 , 2021
मुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. खुशपत जैन यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com