संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24 :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी शहरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून येथील प्रत्येक सण उत्सव गुण्यागोविंदाने पार पाडत असून शहरातील कौमी एकतेचे वातावरण कायम आहे.कामठी शहरात विविध सोयी सुविधांचा अभाव अजूनही कायम असून विविध विकासकामे अजूनही प्रलंबित असून विकासाच्या मार्गावर आहेत.या शहराचे नेतृत्व येथील विविध लोकप्रतिनिधींनी केले मात्र माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विकासात्मक कार्याच्या सपाट्याची सर कुणीही करू शकत नाही.येथील राणीतलाव मोक्षधाम विकासाचा मुद्दा हा नेहमी चर्चेत राहला या राणी तलाव मोक्षधाम च्या विकासासाठी विविध शासकीय निधीतून कोटी रूपयाचा निधी खर्ची घालण्यात आला मात्र या मोक्षधाम चा विकास पूर्णता होऊ न शकल्याने येथील मोक्षधाम चा विषय नेहमी चर्चेचा ठरत होता .मात्र मागील 75 वर्षांपासून सर्व सामुदायिक नागरिकांसाठी उपयोगात येणाऱ्या मोक्षधाम चा विषय मार्गी लागावा यासाठी मोक्षधाम समिती कामठी ने घेतलेल्या पुढाकाराला माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने घेत कामठी आजनी मार्गावर मोक्षधाम निर्मिती साठी कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.व मोक्षधाम च्या तीन एकर जागेत 3 कोटी रुपयांच्या निधीतून मोक्षधाम निर्मिती केली. या नवनिर्मित मोक्षधाम लोकार्पण कार्यक्रम येत्या 28 ऑगस्ट ला होणार आहे तसेच या लोकार्पण कार्यक्रम अंतर्गत भगवान शिवजी ची मूर्ती स्थापना होणार आहे .शहराचा अतिशय औचित्याचा मुद्दा असलेला मोक्षधाम चा विषय मार्गी लागल्याची बाब ही शहरवासियासाठी अभिनंदनास्पद आहे तेव्हा या नवनिर्मित मोक्षधाम लोकार्पण कार्यक्रमात सर्व सामुदायिक मंडळींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मोक्षधाम समिती कामठी चे उपाध्यक्ष अजय अग्रवाल यांनी मोक्षधाम सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.
मोक्षधाम समिती कामठी चे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार यादवराव भोयर व तत्कालीन सचिव हरिशंकर गुप्ता यांच्या मुख्य मार्गदर्शनार्थ कार्यरत असलेले मोक्षधाम समिती कामठी च्या वतीने शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातुन पाऊल उचलले आहेत. पुढे कालांतराने या मोक्षधाम समिती कामठी च्या अध्यक्षस्थानी तत्कालीन सचिव हरिशंकर गुप्तां ची निवड करण्यात आली. तर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष संदीप गुप्तां, सचिव विनोद संगेवार, उपाध्यक्ष अजय अग्रवाल,उपसचिव चंद्रकांत सीरिया, कोषाध्यक्ष रवी गोयल, सदस्य ऍड गोपाल शर्मा, राजेश खंडेलवाल, मनीष मेहाडिया चा समावेश आहे.ही समिती नोंदणीकृत असून या समितीच्या मागनि ला आलेल्या यशातुन शहरात गायत्री स्वास्थ्य उपवन निर्मिती ला यश लाभले ज्याचा सदुपयोग शहरातील सर्व धर्मीय नागरिक घेत आहेत.हे स्वास्थ्य उपवन आज नागरिकांच्या आरोग्यत्मक दृष्टिकोनातुन उपयोगी पडत आहेत त्याच धर्तीवर मागील 75 वर्षांपासून औचित्याचा मुद्दा असलेला मोक्षधाम नवनिर्मिती चा प्रश्न मार्गी लागला असून या मोक्षधाम मध्ये शहरातील सर्व बौद्ध, हिंदू, शीख, जैन समुदायाच्या उपयोगात पडणार आहे. या मोक्षधाम समिती ची एकूण साडे तेरा एकड जमीन असून यातील तीन एकड जागेत शासनाच्या 3 कोटी रुपयांच्या निधींतुन मोक्षधाम निर्मित करण्यात आले आहे.ज्यामध्ये 5 हजार स्केवर फूट चा शोक सभागृह आहे तसेच विसावा साठी चार बर्निंग शेड आहेत. या समितीशी समिती चे संरक्षक या रुपात तेजरामजी जैन बापजी महाराज सुद्धा जुडलेले आहेत. यांच्या मुख्य उपस्थितीत 28 ऑगस्ट ला होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमात 7 फूट उंच भगवान शिवजी ची मूर्ती स्थापित होणार आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत 28 ऑगस्ट ला सकाळी साडे नऊ वाजता श्री गंज के बालाजी मंदिर येथून भगवान शिवजी मूर्ती शोभायात्रा चा शुभारंभ होत जयस्तंभ चौक, दुर्गा चौक, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, कसार ओली चौक, गुड ओली चौक, सराफा लाईन लाला ओली चौक, बोरकर चौक, नेताजी चौक, चावडी चौक, दाल ओली 1, राममंदिर ,मोदी, माहुरे हॉस्पिटल, चौधरी हॉस्पिटल , भुटानी कॉलेज भ्रमण करीत नवनिर्मित मोक्षधाम येथे पोहोचेल.या शहरातील एका वास्तू निर्मितीसाठी कामठी शहरवासीयांना भगवान श्री शिवजी, श्री गुरू गोविंद महाराज, तथागत गौतम बुद्ध , भगवान महावीर चा आशीर्वाद लाभला व या मोक्षधाम नवनिर्मित कार्याला यश लाभले. 28 ऑगस्ट ला होणाऱ्या या लोकार्पण कार्यक्रमात आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असून मोक्षधाम समिती कामठी च्या वतीने या दोन्ही आमदारांचा सत्कार करून आभार मानण्यात येईल तसेच या कार्याला यशस्वी करण्यात मोलाची भूमिका साकारणारे पिडब्लूडी चे आरिफ शेख तसेच नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचा विशेष सत्कार करण्यात येईल.हे नवंनिर्मित मोक्षधाम शहरातील बौद्ध, हिंदू, शीख, जैन सर्व संमुदायाच्या उपयोगात येणार आहे.
या पत्रपरिषदेला मोक्षधाम समिती कामठी चे अध्यक्ष हरिशंकर गुप्तां, कार्याध्यक्ष डॉ संदीप कश्यप, सचिव विनोद संगेवार, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, उपसचिव चंद्रकांत सीरिया, कार्याध्यक्ष रवी गोयल, सदस्य ऍड गोपाल शर्मा, राजेश खंडेलवाल,मनीष मेहाडिया आदी उपस्थित होते.