नागपूर शहरात अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव

संदीप कांबळे, कामठी
–वाहतूक सिग्नल ठरताहेत अनधिकृत जाहिरातदारांचे आश्रयस्थान

कामठी ता प्र 11:- नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लावलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांबाबत येथील महानगरपालिका विभागासह संबंधित प्रशासन विभाग झोपेचे सोंग करून निद्रावस्थेत असल्याने शहरातील विविध भागात अनधिकृत जाहिरात फलकाचे पेव पसरले आहेत तसेच मार्गाच्या कडेला असलेल्या वाहतूक सिग्नल वर लावलेले हे जाहिरात फलक कुणाच्या आशीर्वादाने लावले जातात ?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांचे पेव फुटले असून, जागा मिळेल तिथे हे फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे.
नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या विविध भागांसह इंदोरा चौकात अनधिकृत जाहिरात फलक पाहण्यास मिळतात. प्रत्येक विद्युत खांबावर जाहिरात फलक लावलेले दिसतात; तसेच झाडे, खासगी इमारतींवरही ते दिसतात.तेव्हा अशा अनधिकृत जाहिरात फळकावर संबंधित प्रशासन विभाग कुठलीही कार्यवाही करीत नसल्याने शासनाच्या महसूल चा सर्रास नुकसान करण्यात येत आहे.तर संबंधित विभागीय अधिकाऱ्याना मिळत असलेल्या चिरीमिरीमुळे ‘तेरी भि चूप मेरी भि चूप’अशी भूमिका दिसून येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

निराधारांना एक मानुसकीची मदत

Wed May 11 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 11:- नागपुर ग्रामीण अंतर्गत ग्रा.पं.बेसा- बेलतरोडी येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात असंख्य लोकाँचे संसार उध्वस्त झाले अश्या गरजू लोकांना मदत व्हावी या उदार भावनेतून माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडविले. याप्रसंगी कामठी मौदा विधानसभा कांग्रेस च्या वतीने अग्नितांडवात निराधार झालेंल्या नागरिकांना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!