संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या निंबाजी अखाडा मार्गावरील भागूबाई समाजवभवन समोर केसरवाणी नामक इसमाने संबंधित विभागाची कुठलीही परवानगी न घेता मागील पाच दिवसापासून गुरांचा अवैध गोठा निर्माण करून गुरांचा कळप तयार केलेला आहे.या गुरांच्या कळपातून वाहणारे सांडपाणी , जमा असलेले गुरांचे शेण , गोमूत्र च्या विल्हेवाटची वा निचऱ्याची कुठलीही सोय केली नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात डास व माशी तसेच इतर किटकांचा प्रकोप वाढला आहे परिणामी परिसरात साथरोग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा भागूबाई समाज भवन समोरील निर्माण करण्यात आलेला गुरांचा अवैध गोठा त्वरित हटविण्यात यावा या मागणीसाठी कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक काशीनाथ प्रधान यांच्या नेतृत्वात परिसरातील संतप्त नागरिकांसह मुख्याधिकारी तसेच तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.तसेच अवैधरित्या उभारण्यात आलेला हा गुरांचा अवैध गोठा प्रशासनाने न हटविल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन पूकारण्यात येणार असल्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.
निवेदन देताना माजी नगरसेवक काशीनाथ प्रधान, माजी नगरसेवक नीरज लोणारे, रितेश बावनकुळे, किशोर राऊत,ज्योती राऊत,कमलेश गभने, कुणाल वाघमारे ,अविनाश नरोटे,कल्पना अवचट,नीलिमा इटनकर,आदी उपस्थित होते