बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन

नागपूर, दि. 24 : खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत ५% आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे. तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे, अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना” चा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

            ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मूळ क्रीडा  प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीश: अथवा पत्राद्वारे दि. ३१ मे २०२२ पूर्वी समर्पीत करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील.

            मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी दि. ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे  श्री ओम प्रकाश बकोरिया, यांनी केले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी  अविनाश पुंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागातील 25 लाख शेतकऱ्यांना संगणकीकृत घरपोच सातबाराचे वाटप

Thu Mar 24 , 2022
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विशेष मोहीम नागपूर विभागात 99.31 टक्के मोफत सातबारा वाटप            नागपूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला शेतीचा अधिकार अभिलेख सातबारा मोफत शेतकरी खातेदाराच्या घरोघरी जाऊन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर विभागातील 24 लाख 89 हजार 719  नवीन स्वरुपातील सुधारित गाव नमुना सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहे. विभागातील 99.31 टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.    […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!