नगर विकास मंत्रालयाने येरखेडा नगरपंचायतीची काढली अधिसूचना.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

गावकऱ्यांनी नगर विकास मंत्रालयाच्या अधिसूचनेचा जल्लोष करून स्वागत केले. 

कामठी ता प्र 9:- महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालयाने 4 ऑक्टोंबर 2024 ला येरखेडा नगरपंचायतीची अधिसूचना जाहीर केल्याने येरखेडा येथील गावकऱ्यांच्या वतीने नगर विकास मंत्रालयाचे जल्लोष करून स्वागत केले नगर नागपूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळण्यासाठी गावकऱ्यांच्या चार महिन्यापासून प्रयत्न सुरू सुरू होते गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना निवेदन देऊन यरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत च्या दर्जा मिळण्याची मागणी केली होती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी तक्रारीची दखल घेत येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला विशेष ग्रामसभा बोलून नगरपंचायतीच्या ठरावा संदर्भात माहिती देण्यास सांगितले होते .ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ग्रामसभा न बोलविल्यामुळे नगरपंचायतीच्या प्रस्ताव धूळ खात पडला होता. सरपंच यांच्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या आदेशाविरोधात गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर 28 दिवस धरणे आंदोलन केले व जिल्हाधिकाऱ्याला नगरपंचायत नगरपंचायत ची मागणी रेटून धरली होती जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम विकास अधिकारी ,गटविकास अधिकारी, तहसीलदार कामठी ,जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडून येरखेडा नगरपंचायत संदर्भात लोकसंख्या व भौगोलिक रचना ,नागरी सुविधेचा प्रस्ताव नगरी विकास मंत्रालयाकडे पाठविला असता नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव अनिरुद्ध जेवढीकर यांनी राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 341 (अ) चे पोट कलमनुसार येरखेडा ग्रामपंचायतचे ग्रामीण क्षेत्रातून नागरिक क्षेत्रामध्ये संक्रमित करण्याची अधिसूचना जारी करून येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत च्या दर्जा मिळण्याची अधिसूचना जारी केली आहे येरखेडा ग्रामपंचायतला नगरपंचायत बनविण्याबाबत 4 ऑक्टोंबर 2024 ला अधिसूचना जारी केली आहे अधिसूचने संदर्भात गावातील ज्या नागरिकांना आक्षेप घ्यायचे असेल त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे एक महिन्याच्या काळात आक्षेप नोंदविण्याचे अधिसूचनेत सांगितले आहे. नगर विकास मंत्रालयाच्या वतीने 4 ऑक्टोबर 2024 ला येरखेडा नगरपंचायती अधिसूचना जारी करताच गावकऱ्यांचे वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,माजी सभापती उमेश रडके यांचे स्वागत करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवेंद्र गवते, एडवोकेट आशिष वंजारी, माजी सरपंच मनीष कारेर्मोरे, मंगला कारेर्मोरे, चेतन खडसे,राजेश पिपरेवार, ईश्वरसिंग चौधरी ,राजकिरण बर्वे ,राजेंद्र चौरे, ग्रामपंचायत गजानन तिरपुडे, जया भस्मे, उपसरपंच मंदा महल्ले पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट, प्रिया दुपारे ,नरेश मोहबे ,जयश्री धीवले ,अनिल भोयर, ज्योती घडले ,आचल तिरपुडे , कुलदीप पाटील, शितल चौधरी ,सुषमा राकडे ,सरिता भोयर, रेणुका गुजेवार, वनिता नाटकर ,सुनिता आगाशे , रेखा मराठे, प्रवीण आगाशे, शुभम चौधरी, जॉनी भस्मे, कुबेर महल्ले, विशाल वाटकर, मुकेश कनोजिया,यश पाटील, राम देशमुख, कुमकुम यादव , प्रीती देशमुख ,  कुणाल गड्डमवार  सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रत्न टाटा कालवश, राज्य सरकारतर्फे एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर, वरळीत होणार अंत्यसंस्कार

Thu Oct 10 , 2024
मुंबई :-टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जाणार आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com