वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 9:- हवामान बदलानुसार आज सकाळी साडेआठ वाजेपासून कामठी तालुक्यात अवकाळी वादळी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असता दरम्यान कामठी तालुक्यातील जाखेगाव येथे शेतातून घरी पायी पायी परत जात असलेल्या 40 वर्षोय शेतकऱ्याचा सकाळी 10,30 वाजता सुमारास वीज पडल्याने मृत्यू झाला असून मृतक शेतकऱ्याचे नाव रामराव शिवराम आखरे वय 42 वर्षे रा जाखेगाव असे आहे. प्राप्त माहितीनुसार जाखेगाव येथील मृतक शेतकरी रामराव शिवराम आखरे यांचे कडे दोन एकर शेती असून शेतात शेतीची कामे करीत असताना सकाळी 10 वाजता सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस व विजेचा कडकडाट झाल्यामुळे ते घराकडे परत निघाले असता 10.30 वाजता सुमारास त्यांच्या अंगावर वीज पडल्याने घटनास्थळीस त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले तसेच माजी जि प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी घटनास्थळी भेट देत घडलेल्या मृत्यू घटनेची निंदनीय चिंता व्यक्त करीत मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मृतक रामराव शिवराम आखरे यांचे पाठीमागे पत्नी, दोन मुले, व एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे तरुण शेतकऱ्याचा अवकाळी विजेणे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजयुमो पॉलिसी व रिसर्च टीमद्वारे युवाकांकरीता व तरूण उद्योजकांकरीता विशेष चर्चा सत्राचे आयोजन!

Fri May 10 , 2024
नागपूर :- चिंता आणि तणाव हे आजकालच्या तरुणांच्या मनातील आणि कार्यरत व्यावसायिकांचे आयुष्यातील घटक आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भाजयुमो नागपूरने मध्य भारतातील आघाडीचे मानसशास्त्रज्ञ डॉ. शिशिर पळसापुरे यांच्यासोबत एक विशेष सत्र मॉर्फिक माईंड्स, ट्राफिक पार्क जवळ, धरमपेठ येथे आयोजित केले होते. यामध्ये भाजपचे नागपुर महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, भायजुमो शहर अध्यक्ष बादल राऊत मार्गदर्शनात हे सत्र पार पडले. भाजयुमो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!