इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन’ १ जानेवारीपासून

नागपूर. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर महानगरपालिकातर्फे नागरिकांना सायकलिंग अँड वॉकिंग करिता प्रोत्साहन देण्यासाठी ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन’ (intercity freedom to walk and cycle campaign) १ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशाप्रमाणे हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल आणि वॉकसाठी प्रोत्साहित करणे आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना नागपूर स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

          स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले की, या स्पर्धेअंतर्गत नागपूरकरांच्या सायकलिंग आणि वॉकिंगचा रेकॉर्ड स्टारवा मोबाइल अप्लिकेशनमध्ये नोंद होणार आहे. जास्तीत जास्त नोंदणी करणारे आणि जास्त किलोमीटर सायकल चालविणारे किंवा वॉकिंग करणाऱ्यांमधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. नागपूरकरांनी मोठ्या संख्येत या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शहर विजेते बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.

          यावर्षी ऑक्टोबरमध्ये नागपुरात स्मार्ट सिटीतर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला आणि मुलांसोबात जास्तीत जास्त नागरिकांना सायकल आणि पायी चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे पुढचे पाऊल म्हणून ‘इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल कॅम्पेन’ आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत स्पर्धकांची सायलिंग आणि वॉकिंगची नोंद स्टारवामध्ये नोंद होणार आहे. तसेच त्यांना आपल्या अनुभवाची सुद्धा नोंद करायची आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरत येथे होणाऱ्या कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा केली जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आरोग्य जनजागृतीच्या संदेशासह धावणार नागपूरकर मनपा, स्मार्ट सिटी आणि एआयईएसईसी तर्फे २ जानेवारीला मॅरेथॉन

Wed Dec 29 , 2021
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीच्या निमित्ताने  नागपूर महानगरपालिका,  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ए.आय.ई. एस.ई.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने २ जानेवारी २०२२ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे आयोजन आजादीका अमृत महोत्सव तसेच रन फॉर ग्लोबल गोल्स यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. २१ किमी, १० किमी आणि ३ किमी अशा तीन गटामध्ये हे मॅरेथॉन होणार असून यामध्ये आरोग्य जनजागृतीच्या संदेशासह नागपूरकर सहभागी होणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी दिली गेलेली लिंक : linktr.ee/AIESECinNagpurMarathon गतिविधि नोंद करण्यासाठी स्ट्रावाऍपइनस्टॉल करणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!