संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
चाकूने वार करून 47 हजार रुपये लुटले
कामठी ता प्र 8 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एचपी पेट्रोल पंप समोरील नेरी शिवारात हैदराबाद वरून दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रक चालकास अज्ञात सहा आरोपींनी चाकूने वार करून गंभीर जखमी करून 47 हजार रुपये लुटल्याची घटना आज 8 जून ला दिवसाढवळ्या साडेबारा सुमारास घडली असून गंभीर जख्मि तरुणाचे नाव सुरज पटेल वय 28 वर्षे रा. उत्तरप्रदेश असे आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर जख्मि ट्रक चालक सुरज हरिमोहन पटेल वय 28 राहणार कयाउद्दीन टूर ,तालुका चयल जिल्हा कुसुबी उत्तर प्रदेश याने ट्रक क्रमांक एम एच 09 जेयु 9309 मध्ये हैदराबाद वरून आयटी पेपर भरून दिल्ली कडे जात असताना नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एचपी पेट्रोल पंप समोरील नेरी शिवारात दिवसाढवळ्या दुपारी साडेबारा वाजता सुमारास दोन मोटारसायकलवर आलेल्या सहा ते सात आरोपीने ट्रक समोर मोटारसायकल आडवी करून ट्रक थांबवून चालकाच्या कमरेवर व मागील सीटवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले व त्याचे जवळील 47 हजार रुपये घेऊन पसार झाले गंभीर ट्रक चालक सुरज पटेल याने दुपारी एक वाजता सुमारास घटनेची माहिती टोल फ्री क्रमांक 112 कंट्रोल रूम नागपूरला दिली असता पोलिसांनी त्वरित घटनेची माहिती नवीन कामठी पोलिसांना माहिती दिली असता ठाणेदार नवीन ठाणेदार संतोष वैरागडे ,पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार सहकार्यांसोबत घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी ट्रक चालक सुरेज पटेल यास पुढील उपचाराकरिता मेओ हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले आहे .गंभीर ट्रक चालक सुरज पटेल यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिस स्टेशनला कलम 392 ,397 नुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन पवार करीत आहेत.