दागिने चोरी करून रिकामी पिशवी फेकली रुळावर

– गोरखपूर एक्सप्रेसमधील घटना
– लोखंडी पुलाजवळ मिळाली पिशवी
नागपूर – अज्ञात चोराने धावत्या रेल्वेत चोरी करून रिकामी पिशवी रेल्वे रुळावर फेकली. गस्तीदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला रिकामी पिशवी नागपूर आऊटरवर म्हणजे मुंबई मार्गावर मिळाली. पिशवीतील कागदपत्रावरून गोरखपूर एक्सप्रेसमधील प्रवासी महिलेची पिशवी असल्याचे स्पष्ट झाले. या पिशवीत अडीच लाखांचा मुद्देमाल होता.
त्रिचिरापल्ली निवासी बेबी तिवारी (48) या 12511 गोरखपूर एक्सप्रेसच्या ए-1 कोचमधील 49 क्रमांकाच्या बर्थवर प्रवास करीत होत्या. पहाटे 4.05 वाजता ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर आली. तत्पूर्वी अज्ञात चोराने झोपेचा फायदा घेत त्यांची पिशवी चोरली. या पिशवीत पावणे दोन लाखांचे दागिने, 60 हजार रुपये रोख आणि इतर साहित्य, असा एकूण 2 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. चोराने यातील दागिने आणि रोख काढून रिकामी पिशवी लोखंडू पुलाजवळ फेकली. या घटनेची तक्रार त्यांनी बल्लारशाह पोष्टला दिली. त्यांच्याकडून वर्धा नंतर नागपूर अंतर्गत ही घटना असल्याने नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला.
सकाळी कंत्राटी मजुर रेल्वे रुळाजवळ काम करीत असताना त्यांना एक पिशवी मिळाली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक भिमटे यांच्या नेतृत्वातील पथक गुन्ह्याच्या तपासात गस्तीवर असताना मजुरांनी पिशवी मिळाल्याचे सांगितले. पथकाने पिशवीची तपासणी केली असता त्यात रोख 2 हजार रुपये, पेन ड्राईव्ह, आधार, ओळखपत्र आदी कागदपत्रे मिळाली. त्यावरून महिलेशी संपर्क साधला असता ती पिशवी स्वतःची असल्याचे तसेच लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी मिळालेल्या कागदपत्राची नोंद केली तसेच लोहमार्ग ठाण्यात जमा केली. पुढील तपास उपनिरीक्षक विजय तायवाडे करीत आहेत.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कन्हान शहराला तीस खाटांचे ग्रामिण रुग्णालय बनविण्यास हालचाली तेज - गज्जु यादव 

Wed Jun 8 , 2022
– आरोग्यमंत्र्यां कडुन आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्य प्रशासनाला सुचना.    कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती सुदृढ होऊ शकते. सर्व काही सुरळीत राहिल्यास लव करच हे प्राथमिक आरोग्य केंद्र ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय होण्याच्या हालचाली ला वेग येत आहे. याबाबत रामटेक पं स चे माजी उपसभापती उदयसिंग उर्फ गज्जु यादव यांनी २०१९ पासुन प्रयत्न सुरू केले असुन त्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com