महानगरपालिकेद्वारे रेन वॉटर हार्वेस्टींग डेमो व्हॅनचा शुभारंभ

चंद्रपूर  – रेन वॉटर हार्वेस्टींग जनजागृतीपर डेमो व्हॅनचा शुभारंभ आज अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीम आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात युद्धस्तरावर राबविली जात असुन नागरीकांना आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग कसे करावे, त्यात आवश्यक घटक कोणते यासंबंधी माहिती मिळावी, सदर यंत्रणा बसविण्यास सहकार्य मिळावे व जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर डेमो व्हॅन पुढील काही दिवस कार्यरत असणार आहे.
सीपीएस इन्व्हॉयर्नमेंट इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे बनविण्यात आलेल्या या व्हॅनवर जे मॉडेल बनविण्यात आले आहे त्यात छतावर पडणारे पावसाचे पाणी जमा करून,स्वच्छ करून नंतर विहीर, बोअरवेल वा शोषखड्ड्यात कसे सोडण्यात येते याचे सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे.
भुजल विभागाने चंद्रपूर शहराची भुजल पातळी ही ५० टक्क्यांनी खालावली असल्याचे निर्देशित केले आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीला सामोर जावे लागु शकते. भविष्यात ही भुजल पातळी आणखी खालावुन आपले शहर डार्क झोन म्हणुन घोषित होऊ नये,याकरीता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेद्वारा छताच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर अनुदान व मालमत्ता करात पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के सुट देण्यात येत आहे. बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य असुन रेन वाटर हार्वेस्टिंग न केल्यास २० हजार रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे.सर्वांनी राहत्या घरी रेन वाटर हार्वेस्टिंग करण्याचे आव्हान मनपाद्वारे करण्यात येत आहे.
याप्रसंगी सीपीएस इन्व्हॉयर्नमेंट इंडिया प्रा.लि. चे संचालक प्रभात धारिवाल यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना यंत्रणा समजाऊन सांगितली. शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरकर, रवींद्र हजारे, नागेश नीत, राजेंद्र देशकर,विवेक देशकर, मनीष जैन, सत्यजित परीहार,कमलेश तसेच रेन वॉटर हार्वेस्टींग कंत्राटदार यांनी डेमो व्हॅनची पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दागिने चोरी करून रिकामी पिशवी फेकली रुळावर

Wed Jun 8 , 2022
– गोरखपूर एक्सप्रेसमधील घटना – लोखंडी पुलाजवळ मिळाली पिशवी नागपूर – अज्ञात चोराने धावत्या रेल्वेत चोरी करून रिकामी पिशवी रेल्वे रुळावर फेकली. गस्तीदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला रिकामी पिशवी नागपूर आऊटरवर म्हणजे मुंबई मार्गावर मिळाली. पिशवीतील कागदपत्रावरून गोरखपूर एक्सप्रेसमधील प्रवासी महिलेची पिशवी असल्याचे स्पष्ट झाले. या पिशवीत अडीच लाखांचा मुद्देमाल होता. त्रिचिरापल्ली निवासी बेबी तिवारी (48) या 12511 गोरखपूर एक्सप्रेसच्या ए-1 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!