संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-तालुक्यात पुन्हा मुलांपेक्षा मुली सरस
कामठी, ता.३: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. कामठी तालुक्याचा बारावीचा निकाल ९३.४४ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्याचा बारावीचा निकाल ६ टक्क्यांनी कमी लागला असून तालुक्यातील १२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य मंडळाच्या परीक्षा होम सेंटरवरच घेण्यात आल्या होत्या. तालुक्यातून २१६३ मुले व १६८३ मुली असे एकूण ३ हजार ८४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १९७७ मुले व १६१७ मुली असे एकूण ३ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९१.४० एवढी आहे. तर ९६.०७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९३.४४ टक्के एवढा लागला आहे. यात ४४२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, १४२५ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर १४६८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर केवळ २०५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर १२ कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. यात नूतन सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय कामठी, भोसला मिलिटरी स्कूल पंचवटी कोराडी, सौरभ चांभारे कनिष्ठ महा. टेमसना, स्व. झेड. बाविस्कर कनिष्ठ महा. पावनगाव, मास्टर नूर मो. उर्दू कनिष्ठ महा. कामठी, प्रागतिक कनिष्ठ महा. कोराडी, श्री जयंतराव वंजारी कनिष्ठ महा. वडोदा, इंडियन ऑलिम्पियाड कनिष्ठ महा. भिलगाव, श्री गणपती ज्यू.कॉलेज शिरपूर, रामकृष्ण शारदा मिशन ज्यू कॉलेज कामठी, प्रियांती ज्यू कॉलेज तरोडी, स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल कामठी यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर एम एम रब्बानी ज्यू कॉलेज कामठी (९५.२३), एस. के. पोरवालज्यू कॉलेज कामठी (८०.२३), एस आर लोईया ज्यू कॉलेज कामठी (९५.५५), नूतन सरस्वती गर्ल्स ज्यू कॉलेज कामठी (९७.७७), विद्या मंदीर ज्यू कॉलेज कोराडी(९८.९५), तेजस्विनी ज्यू कॉलेज कोराडी(९६.६५), आर्टस, कॉमर्स व सायन्स ज्यू कॉलेज कोराडी(९८.५०), तुळजा भवानी ज्यू कॉलेज गुमथळा (९९.४९), सरस्वती ज्यू कॉलेज न्यू पांजरा कोराडी(९९.८६) लागला आहे.
कामठी तालुक्यातील ९३.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com