संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- कामठी नगर परिषद च्या वतीने अंतिम मतदार यादी 5 जुलै ला प्रसिद्ध करण्यात आली असून यात कामठी शहरातील एकूण 82 हजार 685 मतदारांचा समावेश आहे.
राज्याच्या राजकीय नाट्य घडामोडीनंतर स्वराज्य संस्थांची निवडणूकीची घोषणा ही केव्हाही होऊ शकते त्या अनुषंगाने कामठी नगर परिषद च्या निवडणूक विभागाने आपले कामे जोमात सुरू केले असून प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार प्रभाग क्र 1 मध्ये 3844 मतदार,प्रभाग क्र 2 मध्ये 5829, प्रभाग क्र 3 मध्ये 4247, प्रभाग क्र 4 मध्ये 4255, प्रभाग क्र 5 मध्ये 4398, प्रभाग क्र 6 मध्ये 4936, प्रभाग क्र 7 मध्ये 5949, प्रभाग क्र 8 मध्ये 4857, प्रभाग क्र 9 मध्ये 5105, प्रभाग क्र 10 मध्ये 5204, प्रभाग क्र 11 मध्ये 4984, प्रभाग क्र 12 मध्ये 5342, प्रभाग क्र 13 मध्ये 4502, प्रभाग क्र 14 मध्ये 5070, प्रभाग क्र 15 मध्ये 4474, प्रभाग क्र 16 मध्ये 5097, तर प्रभाग क्र 17 मध्ये 4592 मतदारांचा समावेश आहे.तर लवकरच 9 जुलै ला बुथनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने त्यानंतर निवडणुकीची आचार संहिता लागू होणार तर नाही ना ..अशीही चर्चा रंगत आहे
दरम्यान नगर परिषदेकडुन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच भावी नगरसेवक अधिक जोमाने कामाला लागले असून आपल्या प्रभागातील मतदार यादीतील आपले मतदार कोणकोण आहेत याची ओळख करून घेण्यास व मतदार यादी पाठ करून घेण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तर मतदारही आपले मतदान कोणत्या प्रभागात आहे याची खात्री करून घेत आहेत.राज्यात सत्ता हस्तांतरणानंतर भावी नगरसेवक कोणता झेंडा हातात घेऊ या संभ्रमात पडलेला दिसून येत आहे.
कामठी नगर परिषदेचे 82 हजार 685 मतदार
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com